शिवसेनेच्या या माजी खासदाराने भाजपविरुद्ध थोपटले दंड, हे आहे वादाचं कारण

शिवसेनेच्या या माजी खासदाराने भाजपविरुद्ध थोपटले दंड, हे आहे वादाचं कारण

'शिवसेनेच्या मतदार संघात भाजपचं प्रचार ऑफिस आम्हाला नको आणि त्यांची ढवळाढवळही नको. हा प्रकार आम्ही सहन करणार नाही.'

  • Share this:

औरंगाबाद 24 सप्टेंबर : लोकसभा निवणुकीत राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं. मात्र शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. भाजपने काम केलं नसल्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप खैरे यांनी अनेकदा केला होता. आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना खैरे यांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. शिवसेनेच्या मतदार संघात भाजपचं प्रचार ऑफिस आम्हाला नको आणि त्यांची ढवळाढवळही नको असा इशाराच त्यांनी भाजपला दिलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीत औरंगाबाद विभागात भाजप विरुद्ध शिवसेने असा सामना रंगणार आहे.

निवडणुकीच्या आधी EDचा दणका, शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल!

खैरे म्हणाले, लोकसभेत भाजपने माझ्या विरोधात काम केलं. त्यामुळे मला नुकसान सहन करावं लागलं. यंदा मात्र माझं बारीक लक्ष आहे. सेनेच्या मतदार संघात भाजपचे प्रचार कार्यालय सहन करणार नाही. सेना सुद्धा भाजपच्या मतदार संघात ढवळाढवळ करणार नाही. चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्याने मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेत नवा वाद भडकण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा आहे तरी काय?

मनसे मराठवाड्यात लढविणार 32 जागा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांची गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक झाली. त्यात राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित होते. विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

'धनंजय मुंडे हे फक्त चमको आणि टपोरीगिरी करण्यात वस्ताद'

मराठवाड्यात मनसे निवडणूक लढवणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. मराठवाड्यातील किती जागा लढवायच्या याबाबत मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 32 जागा लढवण्यासाठीचा प्रस्ताव मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर ठेवला जाणार असल्याचे सुमित खांबेकर यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा प्रमुखांची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे. या बैठकी मध्येच राज्यातील कोणत्या भागात किती जागा लढवल्या जाणार हेही जाहीर होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 09:34 PM IST

ताज्या बातम्या