CM उद्धव ठाकरे यांच्यासमोरच खासदार जलील आणि खैरेंमध्ये खडाजंगी

CM उद्धव ठाकरे यांच्यासमोरच खासदार जलील आणि खैरेंमध्ये खडाजंगी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जलील यांना बसण्यासाठी खैरे यांच्या बाजूला खुर्ची टाकण्याची सूचना केली. खैरे मात्र जागेवरून उठले नाहीत.

  • Share this:

औरंगाबाद 09 जानेवारी : औरंगाबाद आणि संभाजीनगर या एकाच शहराच्या दोन नावावर शिवसेना आणि एमआयएममच्या नेत्यांमध्ये आज वाद झाला. या दोघांमध्ये औरंगाबाद येथील राजकारण आजही साप मुंगसाच्या शत्रूत्वा सारखेच आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी विभागीय जिल्हावार बैठका घेतल्या. या बैठकीला एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील आणि सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे दोघेही उपस्थित होते. जलील यांनी आपल्या समस्या मांडतांना औरंगाबाद असा उल्लेख करीत आपली समस्या मांडली. खैरे मात्र त्यांना औरंगाबाद नाही तर संभाजीनगर म्हणा असे वारंवार सांगत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही औरंगाबादचा उल्लेख आपल्या भाषणात सुद्धा संभाजीनगर असाच उल्लेख केला.

या विषयी इम्तियाज जलील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, आता त्यांची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री खुद्द उद्धव ठाकरे आहेत ते काहीही म्हणू शकतात. त्यांचे संभाजीनगर असले तरी माझं हे औरंगाबादचं राहणार आहे अशी प्रतिक्रिया दिली. यावरून त्यांच्यात बैठकीतच खडाजंगी झाल्याने बैठकीची कमी आणि वादाचीच चर्चा जास्त झाली.

संमेलनाध्यक्ष अमान्य, संमेलनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाची महानोरांना धमकी

चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्याच नेहमीच एकमेकांवर जहरी टीका करण्याची सवयच आहे. ते दोघे सोबत बसण्यालाही टाळत असतात.  मात्र  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या विभागीय बैठकीत बसण्याच्या जागेवरून वादाची ठिकाणी पडली. या बैठकीला लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आमंत्रित होते. औरंगाबादचे  खासदार इम्तियाज जलील यांच्या खुर्चीवर चंद्रकांत खैरे बसले. नंतर आलेले खासदार इम्तियाज जलील मागे दुसऱ्या रांगेत बसले.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद, आता हे आमदार झाले नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जलील यांना बसण्यासाठी खैरे यांच्या बाजूला खुर्ची टाकण्याची सूचना केली. खैरे मात्र जागेवरून उठले नाहीत. या विषयी बाहेर आल्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले खुर्चीवर बसण्यावरून आमचे काहीही वाद झाले नाहीत. मात्र जलील यांनी कबुली देत खैरे यांना 20 वर्षा पासून त्या खुर्चीवर बसण्याची सवय आहे. आताही ते खासदार नसल्याचे विसरले असावेत असा टोला हाणाला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2020 09:28 PM IST

ताज्या बातम्या