Home /News /maharashtra /

‘शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊ नका, नियम बदला’; फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल

‘शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊ नका, नियम बदला’; फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल

मोदी साहेबांनी सुद्धा स्वतः फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना पहिले मदतीचा हात दिला पाहिजे असंही फडणवीसांनी सांगितलं.

बीड 20 ऑक्टोबर:  निकषात बसत नाही, नियमात बसत नाही अशी कारणं देऊन चालणार नाही. शेतकऱ्यांला उडवाउडवीचे उत्तर देऊ नका नियमात बसत नसेल तर नियम बदला राज्यकर्त्यांनी खंबीर भूमिका घेणे गरजेच असतं असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा केला आहे. राज्य सरकार कारण सांगत आहे, केंद्र मदत करत नाही, पैसे दिले नाही, अनेक जिल्हयात हजारो कोटींची बांधकामं सुरू आहेत त्यासाठी पैसा आहे मात्र शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील तेव्हाच कारणं दाखवत आहेत असा आरोपही त्यांनी केला. केंद्राची मदत येईल मात्र त्याआधी राज्य सरकारने थेट मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.  ते बीड मधील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करताना बोलत होते. पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, मका आणि फळबागांचे पूर्णपणे अतोनात नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे उद्या रब्बीची पेरणी करताना सुद्धा शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे अशा परिस्थिती मध्ये तात्काळ मदत मिळाली पाहिजे ही अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी ऊस झोपला आहे त्या ठिकाणी पंचनामे होत नाहीत. सरकार सांगतं निकषात बसत नाही असं कसं निकषात बसत नाही, निकषात बसवावं लागतं. पीक वाहून गेलं हे निकषात बसत नाही अस म्हणून कसं चालेल. एकनाथ खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झुंबड आमचा शेतकरी राबराब राबतो घाम गाळतो त्यानंतर पिक येत निसर्गाच्या कोपामुळे पूर्णपणे नष्ट होत असेल तर नियम आणि निकष बदला. राज्यकर्त्यांनी खंबीर भूमिका घेणे गरजेच असतं. राज्य सरकर कारणं सांगत आहे, केंद्र मदत करत नाही, पैसे दिले नाही, अनेक जिल्हयात हजारो कोटी बांधकाम सुरू आहेत त्यासाठी कारणं नाहीत मात्र शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील तेव्हाच कारण दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आहेत. सरकारवर दबाव निर्माण करू व शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत मिळेल या संदर्भात आम्ही प्रयत्न करू असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा स्वतः फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना पहिल्यांदा मदतीचा हात दिला पाहिजे असंही फडणवीसांनी सांगितलं.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Devendra Fadnavis

पुढील बातम्या