लातूरमध्ये 'स्टार वॉर'; रितेश देशमुख Vs बाबा रामदेव असा रंगणार सामना

लातूरमध्ये 'स्टार वॉर'; रितेश देशमुख Vs बाबा रामदेव असा रंगणार सामना

रितेश देशमुख आणि जेनेलियाचा प्रचार सुरू असताना आता सेनेसाठी बाबा रामदेव तीन दिवस लातूरमध्ये मुक्कामी असणार आहेत.

  • Share this:

नितीन बन्सोडे, लातूर 15 ऑक्टोंबर : मराठवाड्यात ग्रामीण मतदार संघात देशमुख विरुद्ध देशमुख असा सामना आता चांगलाच रंगतोय. काँग्रेसचे धिरज देशमुख यांच्या प्रचारासाठी बॉलिवूड स्टार आणि त्यांचे बंधू रितेश आणि जेनेलिया देशमुख तर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांच्या प्रचारासाठी बाबा रामदेव तीन दिवस लातुरात मुक्कामी आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडणार असून यात मतदारांच्या मनावर कोण आपलं मत ठसवतं यावरच 24 तारखेचा निकाल ठरणार आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्यापासूनच लातूर ग्रामीण मतदार संघाकडं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे ऐनवेळी भाजपचा हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळं.

सत्तेसाठी राणेंची सर्वात मोठी तडजोड; सेनेशी जुळवून घेणं राणेंना अपरिहार्य

त्यानंतर काँग्रेसच्या धिरज देशमुखांसाठी त्यांचे भाऊ सिने अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया धावून आले आणि मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडवला. मात्र तरीही शिवसेनेच्या गोटात शांतताच होती.  मात्र आता शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांनी प्रचारासाठी थेट रामदेव बाबांनाच तीन दिन दिवस मुक्कमी बोलावलंय.

'ना'राजीनामा नाट्य! शिवसेनेच्या 350 पदाधिकारी, 36 नगरसेवकांचा केला जय महाराष्ट्र

त्यामुळं बॉलिवूड विरुद्ध योगगुरू असा सामना रंगणार आहे. शिवाय देशमुख विरुद्ध देशमुख यांच्यातल्या या सामन्याला रंगतही येणार आहे. गनिमी कावा करून हा सामना जिंकणार असल्याचं मत सेनेच्या उमेद्वारानं व्यक्त केलंय. शिवाय तत्व विरुद्ध रसद अशी ही लढाई असल्याची बोचरी टीका देखील शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांनी केलीय.

अजित पवारांसोबत प्रचार केल्यानंतर राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपप्रवेश

धीरज देशमुख यांच्याकडे या भागात मोठा वारसा आलाय. विलासराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. त्याचा फायदा त्यांना मिळणार आहे. शिवाय काँग्रेसला मानणारा मोठा मतदार असल्याने त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र बदलतं राजकारण, भाजपचा वाढता प्रभाव आणि नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि प्रस्थापितांविरूद्धची हवा यामुळे धीरज देशमुखांना ही निवडणूक सोपी जाणार नाही असंही म्हटलं जातंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 15, 2019, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading