पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, खडसेंनी दिले 'भाजप' सोडण्याचे संकेत

पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, खडसेंनी दिले 'भाजप' सोडण्याचे संकेत

जास्त उघड करुन दाखवलं तर शिस्तभंगाची कारवाई होईल

  • Share this:

परळी, 12 डिसेंबर: भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या गोपीनाथ गडावर आयोजित पंकजा मुंडेंच्या या 'खास' मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. अनेक नेत्यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. एवढेच नाही तर

पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, असे सांगत खडसेंनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.

पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही घडवला, खडसेंनी स्वकीयांवर घणाघात केला आहे. शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडेच्या मतदारसंघात पंकजा पराभूत झाली हे दु:ख आहे. पंकजाला बोलता येत नाहीय ती वेदना सहन करतेय, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. जुन्या नेत्यांनी पक्ष सोडून जावे, अशी नीती अवलंबली जात आहे. माझ्या समंतीशिवाय देवेंद्र पक्षाध्यक्ष झाले नसते. आधी माझं तिकीट कापलं गेलं. जास्त बोललं तर शिस्तभंग होईल, अशी धमकी देण्यात आली. एकनाथ खडसेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक करत अजून किती दिवस सहन करायचं? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

दरम्यान, सभेपूर्वी बोलताना आपण भाजपवर नाराज नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. "मी निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले. म्हणूनच आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ मी भाजपवर नाराज आहे, असा नाही. पंकजा मुंडे भूकंप करणार. भूकंप ही काही चांगली बाब नाही. पण कुणाचीही हानी होणार नाही, असा भूकंप करण्याचा प्रयत्न मी करेन." असे संकेत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आधीच दिले होते.

एकनाथ खडसे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

-हळूहळू हे चित्र तयार करण्यात आलं

-पराभवाचं शल्य विसरुन जा

-आमचा वाघ नसला तरी वाघीण आहे

-गोपीनाथ मुंडेंच्या आणि माझ्या जीवनात जसा प्रसंग आला तसा तुमच्या आयुष्यात येऊ नये

-आता किती अपमान सहन करता असा याचा अर्थ

-अजून यांना खात्री पटत नाही - एकनाथ खडसे

-पक्ष सोडून जावं अशी नीती अवलंबली जातीय

-पंकजाला बोलता येत नाही, तीन वेदना सहन करतेय

-अजून किती दिवस सहन करायचं

-जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ

-फडणवीस यांना पक्षाध्यक्ष करणारे

-आम्ही उभं आयुष्य

-गोपीनाथ मुंडे असते तर मीच मुख्यमंत्री असतो

-माझ्या समंतीशिवाय देवेंद्र पक्षाध्यक्ष झाले नसते

-आधीच माझं तिकीट कापलं गेलं

-जास्त बोलल तर शिस्तभंग होईल

-आज जे चित्र आहे ते जनतेला मान्य नाही

-मुंडेच्या मतदारसंघात पंकजा पराभूत झाल्या हे दु:ख

-जास्त उघड करुन दाखवलं तर शिस्तभंगाची कारवाई होईल

-एकनाथ खडसेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

-आपल्यावर देवेंद्र फडणवीसांचे केवढे उपकार

-गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु करा हा निर्णय मी घ्यायला लावला होता

-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

-गोपीनाथजी असते तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाले असते

-माझा भरोसा धरु नका - खडसे

-किती दिवस .सहन करायचं

-आम्हाला उद्धस्त करण्याचं काम आपल्या लोकांनी केलं

-हे घडलं नाही घडवलं

-मुंडेच्या मतदारसंघात पंकजा पराभूत झाली हे दु:ख

-पंकजाला बोलता येत नाहीय ती वेदना सहन करतेय.

-पक्ष प्रिय आणि पक्षाचे नेतेही प्रिय.

-पक्षाचा मला आदेश आहे की पक्षाविरोधात बोलू नका

-मुंडेंसारखाच संघर्षाचा प्रसंग माझ्या आयुष्यात घडतोय

-गोपीनाथ मुंडेंनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही

-कार्यकर्त्याला उंचीवर नेण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं

-शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या पक्षाला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं - खडसे

-गोपीनाथ मुंडेंसोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली - एकनाथ खडसे

-महादेव जानकर हे मुंडे साहेबांच्या प्रेमामुळे आणि पंकजा मुंडेंच्या वरच्या जिव्हाळ्यामुळे रहात आहेत

Published by: Sandip Parolekar
First published: December 12, 2019, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading