मोठ्या मनाची तन्वीर.. आठ वर्षाय चिमुकलीने पूरग्रस्तांना दिले बर्थडेसाठी जमवलेले पैसे

मोठ्या मनाची तन्वीर.. आठ वर्षाय चिमुकलीने पूरग्रस्तांना दिले बर्थडेसाठी जमवलेले पैसे

मदत देण्यासाठी मोठी श्रीमंती नाही तर मोठं मन असावं लागतं.

  • Share this:

बीड, 13 ऑगस्ट- मदत देण्यासाठी मोठी श्रीमंती नाही तर मोठं मन असावं लागतं. कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून ओघ सुरु झाला आहे. या मदत यज्ञात प्रत्येक जन आपापल्या परीने मदत करताना दिसत आहे. घरातील लोक काही तरी देत आहेत, हे पाहिल्यावर शेख तन्वीर या 8 वर्षांच्या चिमुकलीने तिच्या वाढदिवसासाठी वर्षभर जमा केलेल्या पैशाचा गल्ला वडिलांच्या हातात दिला आणि त्या पैशातून बिस्किट घेऊन ते पूरग्रस्तांना पाठवले आहे. एवढ्या बाल वयात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या शेख तन्वीरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बीड शहरातील शेख तन्वीर शेख रिजवान या आठ वर्षीय चिमुकलीने नवा आदर्श घालून दिला आहे. आई-वडील नातेवाईकांनी चॉकलेटसाठी दिलेले पैसे बर्थडेसाठी गल्ल्यामध्ये साठवून ठेवले होते. या पैशात नवे कपडे घेता येतील, असे तन्वीरने ठरवलं होतं. घरात टीव्हीमधील आणि वृत्तपत्रात बातम्या वाचून तन्वीर वडिलांना म्हणाली, 'बाबा मला यावर्षी कपडे नको..आपण हे पैसे पूरग्रस्तांना देऊ.' शाळेत आणि घरातील लोक पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करतात. मग या वर्षी कपड्यापेक्षा त्यांना खाऊ देऊ, असा तिने हट्ट धरला होता. तन्वीर हिने गल्ल्यातील पैसे काढून वडिलांना दिले.

तन्वीर ही द.बा. घुमरे पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. या मुलीची मदत करण्याची वृती इतरांना प्रेरणा देणारी आहे. घरातील संस्कार मुलांना घडवतात, तन्वीर ही याचे उत्तम उदाहरण आहे.

स्वत: नायब तहसीलदारांनी पाठीवर वाहून नेली अन्नधान्याची पोती

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शासन पातळीवर ही मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. त्यातच निगडी येथील अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रवाना करण्यात आली आहे. ही अन्नधान्याची पोती स्वतःच्या खांद्यावर वाहून नायब तहसीलदार तथा परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे.

अनेक शासकीय अधिकारी असे असतात की, ते त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतात. पण, निगडी येथील नायब तहसीलदार दिनेश तावरे यांनी परिस्थितीचे भान समजून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या धान्याची पोती स्वत: खांद्यावरून वाहून नेली. आपले पद बाजूला ठेऊन कर्मचाऱ्यांबरोबर ग्राउंड लेव्हलला काम करणारे असे अधिकारी क्वचित आढळतात.

VIDEO : बाळ जन्मलं आणि पुराने वेढा घातला, कशी केली सुटका? ऐका आई-बाबाची कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2019 03:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading