Home /News /maharashtra /

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा, उपचारादरम्यान महिलेच्या पायात झाल्या चक्क अळ्या

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा, उपचारादरम्यान महिलेच्या पायात झाल्या चक्क अळ्या

नातेवाईकानी वारंवार उपचारासाठी विनंती करूनदेखील डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

बीड, 04 फेब्रुवारी : रुग्णालयात उपचार घेणा-या वृद्धेच्या पायात चक्क अळ्या आढळल्याने आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा कारभार समोर आला आहे. पट्टी बदलताना प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. बीड जिल्हा रुग्णालयात चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या वृद्ध महिलेच्या पायात अळ्या झाल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला. या घटनेने आरोग्य विभागाचे वास्तव समोर आले आहे. नातेवाईकानी वारंवार उपचारासाठी विनंती करूनदेखील डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. शेवटी पत्रकार मंडळीनी विनंती केल्यानंतर परिचारिकेने जखमेची पट्टी बदलताना हा सगळा प्रकार समोर आला. आरोग्य विभागाचा हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असा प्रश्न सामन्यांकडून उपस्थित केला जात आहे. बीड तालुक्यातील सात्रा गावातील गऊबाई वामन जगताप (85) असे उपचार घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. गऊबाई यांच्या पायाला थोडीशी जखम झाल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आणले. निदान करून त्यांना वॉर्ड क्र. 3मध्ये दाखल केले. उपचाराकडे दुर्लक्ष झाल्याने जखम दिवसेंदिवस गंभीर होत गेली. त्यामुळे पायाला गँगरीन झाल्याचे समजते. इतर बातम्या - त्या नराधमालाही पेट्रोल टाकून जाळा, हिंगणघाट पीडितेच्या आईची मागणी एवढी गंभीर परिस्थिती असतानाही डॉक्टरांकडून वेळच्या वेळी पट्टी बदलणे किंवा जखम स्वच्छ करणे अपेक्षित होते. त्यावर शस्त्रक्रिया करणेही गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले गेले. सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पत्रकार मंडळीच्या उपस्थित नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर परिचारिकांनी जखम स्वच्छ करून पट्टी बदलली. याच वेळी जखमेत अळ्या झाल्याचे उघडकीस आले. हा प्रकार पाहून नातेवाईकांना धक्काच बसला. इतर बातम्या - शिक्षकाने शाळेतल्या 20 चिमुरड्यांवर केले अनैसर्गिक कृत्य, दाखवायचा अश्लील VIDEO हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कारवाईची मागणी केली जात आहे .यापूर्वी डोक्यात अळ्या पडल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्यावेळस देखील वेळेवर पट्टी न बदलल्यामुळे त्या रुग्णाच्या डोक्यात अळ्या पडल्या होत्या. इतकंच काय तर दोन दिवसांपूर्वी सलाईनमध्ये शेवाळ निघाल्याने खळबळ उडाली होती. रोज नवनवीन प्रकार समोर येत असल्याने जिल्हा रुग्णालयातील उपचाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या बाबतीत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे ऑफ कैमेरा सांगितले. या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयात कसा उपचार होतो याचे वास्तव समोर आले आहे. इतर बातम्या- माटूंगा स्टेशनवर प्रेयसीची हत्या करताना प्रियकराचाच झाला मृत्यू, नेमकं काय घडलं
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या