मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अरे देवा! सकाळी पेरणी केली, अन् धुव्वाधार पावसाने संध्याकाळी शेत वाहून गेलं

अरे देवा! सकाळी पेरणी केली, अन् धुव्वाधार पावसाने संध्याकाळी शेत वाहून गेलं

गेले काही दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस येत असल्याने शेतऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र पाऊसच एवढा काही ठिकाणी जोराचा झाला की मातीही त्या प्रवाहात वाहून गेली. त्यामुळे सगळ्याचं पेरणीवर पाणी फिरलं आहे.

जालना 16 जून: भोकरदन तालुक्यातील मणापूर शिवारात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये शेतकऱ्यांनी लागवड केलेलं बी बियाणे पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या दोन दिवसापासून मृग नक्षत्राचा पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांनी मका, कपाशी, मिर्ची आदी बी बियाण्यांची लागवड करण्यास सुरुवात केलीय. मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने लागवड केलेलं बी बियाणे वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं. शेतकरी ज्ञानेश्वर दळवी यांनी कपाशी व मिर्ची, तर श्रीराम दळवी यांनी दिड एक्कर मध्ये मका, तर संजय दळवी यांनी 3 एकरमध्ये कपाशीची लागवड केली होती ती वाहून गेल्याने शेतकरी हैराण झालेत. दरम्यान, शेतकरी राजाला वेळोवेळी अनेक अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असून आर्थिक टंचाई सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेले काही दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस येत असल्याने शेतऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र पाऊसच एवढा काही ठिकाणी जोराचा झाला की मातीही त्या प्रवाहात वाहून गेली. त्यामुळे सगळ्याचं पेरणीवर पाणी फिरलं आहे. हेही वाचा -  धारावी नव्हे तर मुंबईतील 'हा' भाग आता कोरोनाचा हॉटस्पॉट; आठवडाभरातच रुग्ण वाढले नववीत शिकणाऱ्या विराजची कमाल, कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी बनवला 'रोबो' Lockdownमुळे भारतातील 38% स्टार्टअप्स कंगाल, काहींकडे 1 महिन्यासाठी पैसे शिल्लक
First published:

Tags: Marathwada

पुढील बातम्या