90 टक्के पिकांचे नुकसान, आयुक्त म्हणाले एकही शेतकरी 'वंचित' राहणार नाही

90 टक्के पिकांचे नुकसान, आयुक्त म्हणाले एकही शेतकरी 'वंचित' राहणार नाही

पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे होणार असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये...

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,2 नोव्हेंबर: औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहाणी केली. पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे होणार असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. पाहणीनंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय,मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील,आदींची उपस्थिती होती.

केंद्रेकर म्हणाले, पिकांची खूप वाईट परिस्थिती आहे. 90 टक्के नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मका या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरसकट पंचनामे होणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. सर्व यंत्रणांना तशा सूचना केल्या असल्याचे यावेळी केंद्रेकर यांनी सांगितले. त्यापूर्वी बीड, गेवराईसह माजलगाव तालुक्यात पाहणी केली. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यांना सुचना देत एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहु नये. याकरता साध्या कागदावर ही त्यांचे अर्ज स्विकारा, त्यावर मात्र बॅंक खाते क्रमांक व आयएफसीकोड लिहून घ्या. आपल्या भागातील पंचनामे करतेवेळी जिओ टॅगीगचा वापर करा,अशा सूचना दिल्या.

ऐन दिवाळीत पावसाने शेतकऱ्यांना रडवलं.. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे सोयाबीन जाग्यावर उगवून आली तर मक्याच्या कणसाला पालवी फुटली आहे. कापसाच्या पूर्णपणे 'वाती' झाल्या आहेत. एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ मदत दिली तर शेतकऱ्यांला आधार मिळू शकतो.

मागील आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडाली आहे. बीड तालुक्यातील बाळापूर गावातील उषा लोखंडे याच्या शेतातील पाच एकर सोयाबीन काढून ठेवला, मात्र पावसाने मळणी करता आले नाही. त्यात पावसाने उघडीक न दिल्याने काढून ठेवलेल्या सोयाबीन वापून आली. ही सोयाबीन विकून दिवाळीचा आनंद घेण्याची त्यांचे स्वप्न मातीमोल झाले.

अशीच काही परिस्थिती अण्णा लोखंडे यांची आहे. मुलीचे लग्न केले. सोयाबीनच्या पिकावर राहिलेली देणी देता येईल, दिवाळी साजरी करता येईल, असे त्यांना वाटत होते. पण परतीच्या पावसाने त्यांना अडचणीत आणले आहे. सोयाबीन काढून ठेवली ती देखील काळी पडली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला आहे, अशीच भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक जोमात होती. मक्याला चांगली कणसे लागलेली होती. मात्र खळ्यासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांवर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पावसाने सुरुवात केल्याने मका जाग्यावर पडली जी मका 40 ते 50 पोते मका होते. मात्र, या वर्षी पावसाने काहीच पदरात पडले नाही. उलट जनावरांना टाकायचा चारा देखील काळा पडला. यामुळे केलेला खर्च निघाला नाही तर दिवाळी साजरी करावी कशी? असा प्रश्न युवा शेतकरी प्रवीण जाधव याने व्यक्त केला.

परतीच्या पावसाने मुक्काम वाढवल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग कापूस मका या पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. लवकर खळे करून यंदाची दिवाळी गोड करावी, या आशेने शेतकऱ्यांने केलेल्या नियोजनावर पावसाने पाणी फिरले आहे. उभ्या सोयाबीनला कर फुटत आहेत. शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली असून प्रचंड प्रमाणात सोयीबनचे नुकसान झाले आहे.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

First published: November 2, 2019, 8:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading