मद्यधुंद टोळक्याकडून मुलीचा विनयभंग; रिक्षातून बाहेर ओढले तितक्यात..

मद्यधुंद टोळक्याकडून मुलीचा विनयभंग; रिक्षातून बाहेर ओढले तितक्यात..

पीडित मुलगी 16 वर्षाची असून ती घराकडे जात होती. आरोपी मद्यधुंद अवस्ठेत होते.

  • Share this:

लातूर, 22 नोव्हेंबर: शहरात गंजगोलाईत चार जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलीला रिक्षातून बाहेर ओढून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी 16 वर्षाची असून ती घराकडे जात होती. आरोपी मद्यधुंद अवस्ठेत होते. मुलीने प्रसंगावधान राखून आरडाओरडा करत टोळक्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. दरम्यान, माजी खासदार सुनील गायकवाड हे तेथून जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी गाडी थांबवली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी आरोपींचा पाठलाग केला, परंतु अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले.

मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (19 नोव्हेंबर) रात्री साडे नऊ वाजता गंजगोलाईत ही घटना घडली. एकट्याने प्रवास करणाऱ्या सोळा वर्षाच्या मुलीला रिक्षातून खाली ओढून तिचा विनयभंग करण्यात आला. या भागात दररोज पोलिस व्हॅन थांबते. तेथेच ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा प्रकारांना आळा घातला नाही तर परीस्थिती गंभीर होऊ शकते, असेही सु्ज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.

फेसबुकवर पोस्ट...

माजी खासदार सुनील गायकवाड यांनी या प्रकाराची माहिती फेसबुकवर पोस्ट करून सर्वांना दिली. त्यानंतर या प्रकाराची पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपाधीक्षक सचिन सांगळे यांनी गंभीर दखल घेत पोलिस पथके तपासासाठी पाठवली आहेत.

महिला असुरक्षित..

लातूर शहरात आता भर रस्त्यावर महिला आणि मुलींचा विनयभंग करण्याच्या घटना वाढल्या आहेत. गंजगोलाई, कापड लाइन, मशीद रोड, औसा रोड, अंबाजोगाई रोड, दयानंद गेट जवळील भाजी बाजार येथे महिलांची छेड काढणे असे प्रकार वाढले आहेत. महाविद्यालये, शाळा सुटण्याच्या वेळेला टारगट मुले सर्रास तेथे जाऊन थांबतात आणि मुलींची छेड काढतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा टारगटांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 22, 2019, 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading