उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द, महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द, महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

  • Share this:

बीड,30 डिसेंबर: शिवसेनेच्या फेसबुक पेजवर जाऊन खालच्या पातळीची कमेंट करणे एका शासकीय अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. अधिकाऱ्यांच्या अंगावर भर कार्यालयात शाई फेकत त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न झाला आहे. फेसबुकवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर संतप्त महिला शिवसैनिकांनी शाई फेकत तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार बीड पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजता घडला. या प्रकारची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण कार्यालयात जाऊन त्याचा पाणउतारा करत त्यांच्या अंगावर शाई फेकली. एवढेच नाही तर सुनील कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासण्याची प्रयत्न केला.

शिवसेनेच्या फेसबुक पेजवर जावून खालच्या पातळीची कमेंट करण सुनील कुलकर्णी यांना चांगलेच महागात पडले आहे. बीडमधील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यानी या अधिकाऱ्याला कार्यालयातच फैलावर घेतले. अधिकाऱ्यांची लायकी काढत माफी मागायला लावली. एवढेच नाही तर या अधिकाऱ्यांच्या अंगावर भर कार्यालयात शाई फेकली व तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे ठाकरे सरकार बद्दल अपशब्द काढला तर याद राख असा सज्जड दम देखील दिला. बीड पंचायत समितीच्या आवरत झालेल्या या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा सुरू सोमवारी सभापती निवडीसाठी लोकांची गर्दी होती. यातच हा सगळा प्रकार घडल्याने बघ्यांनी गर्दी केली होती.

उद्धव ठाकरेंच्या राज्यात शिवसैनिक शिरजोर?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिरामणी तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून शिवसैनिकांनी भर चौकात त्याचे टक्कल करून बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे या व्यक्तीच्या कानाच्या पडद्याला दुखापत झाली होती. शिवसैनिकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी व्यक्तीने केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मुंबईच्या वडाळ्यातील हिरामणी तिवारी यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. मात्र, तेवढ्यावर शिवसैनिक थांबले नाहीत तर त्यांनी हिरामणीचे चक्क मुंडन केले आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तुलना उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागच्या नरसंहाराशी केली होती. त्यावर हिरामणी तिवारी यांनी उद्धव ठाकरेंविरोधात फेसबूक पोस्ट टाकली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी हिरामणी यांनी ही शिक्षा दिली.

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या हाती राज्याची सूत्रे असताना शिवसैनिकांनी कायदा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे गृह मंत्रालयाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे या मारहाण आणि मुंडन प्रकरणी संबंधीत शिवसैनिकांवर कारवाई करण्याचे धाडस पोसिस दाखवणार का? हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या