बीड, 19 मार्च : पालकमंत्री धनंजय मुंडे सत्तेचा गैरवापर करत आहेत, असा आरोप करत बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. उद्या जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्याने बहिष्कार घालण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. या अगोदर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात पंकजा मुंडें यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. (Pankaja Munde boycotts Beed District Bank elections)
जिल्हा बँकेच्या 11 जागेवरील अर्ज बाद झाले होते. त्यामुळं 8 जागेसाठी ही निवडणूक होत आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, सहकार मंत्र्याला हाताशी धरून हे सर्व काय चाललं आहे. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे. पुढे त्या म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे कट कारस्थान सुरू केले असून आम्ही सर्व जातीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरले असताना देखील पूर्ण होत नसल्यामुळे निवडून आलेल्या सभासदांचे कालावधी अल्पकाळ असेल. (Pankaja Munde boycotts Beed District Bank elections)
हे ही वाचा-कटुता संपली? परळीत पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आले एकत्र!
त्याचबरोबर प्रशासक येण्याचे चिन्ह देखील आहेत, त्यामुळे आम्ही या निवडणुकीत माघार घेत असून उद्या कोणीही आमच्याशी संबंधी निवडणुकीत सहभागी होणार नाही असा देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत असून बुडालेली जिल्हा बँक सुरळीत करण्याचे काम गेल्या पाच वर्षांमध्ये केलं. आता बँकेचं वाटोळे करण्याचं सत्ताधार्यांनी ठरवलं आहे, असे देखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, BJP, Dhananjay munde, Pankaja munde