मंत्रिपद घेवून गडावर या.. नामदेव शास्त्रींची धनंजय मुंडे यांना आज्ञा

मंत्रिपद घेवून गडावर या.. नामदेव शास्त्रींची धनंजय मुंडे यांना आज्ञा

गडावर राजकारणाच्या चपला बाहेर काढून या, असे पंकजा मुंडे यांना म्हणणारे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यावर गडावर पुन्हा या अस म्हणणं यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,13 डिसेंबर: पंकजा मुंडेना भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या विरोधानंतर महंत नामदेव शास्त्री चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा नामदेव शास्त्री चर्चेत आले आहेत. यामागील कारणही तसंच आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आमदार धनंजय मुंडे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्या बाबतीत धनंजय मुंडे यांनी स्वतः याबाबत फेसबूक अकाऊंटवर फोटोसह पोस्ट केली आहे. 'साधू संत येती घरा असे म्हणताना..महंतानी आपण मंत्री झाल्यावर गडावर येऊन वैकुंठवासी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावेत, अशी आज्ञा केली असा उल्लेख आहे.

विशेष म्हणजे गडावर राजकारणाच्या चपला बाहेर काढून या, असे पंकजा मुंडे यांना म्हणणारे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यावर गडावर पुन्हा या अस म्हणणं यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

स्व.गोपीनाथ मुंडेच्या अपघाती निधनानंतर प्रथम पुण्यस्मरणाच्या समारंभात गोपीनाथ गड हे नाव दिल्यानंतर. भगवान गडाचा श्वास मोकळा झाला, असे नामदेव शास्त्री म्हटले होते. तेव्हापासून गडावर कोणती राजकीय कार्यक्रम होणार नाही, असे नामदेव शास्त्रींनी जाहीर केले होते. या बाबतीत पंकजा मुंडे समर्थकामध्ये तीव्र नाराजी पसरली होती. भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करून पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला मेळावा घ्यायला भाग पाडले होते. यावेळी पंकजा मुंडे भगवान बाबांच्या जन्मगावी भगवानभक्ती गडाची निर्मिती करत सवता सुभा मांडला. आता सत्तातर झाल्यानंतर धनंजय मुंडेच्या घरी भेट देऊन मंत्री होऊन गडावर या..अशी आज्ञा केल्याने नामदेव शास्त्री पुन्हा चर्चेत आले आहेत.

धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज भगवानगडाचे महंत आदरणीय श्री नामदेवशास्त्री महाराज यांनी माझ्या मुंबईतील निवासस्थानी येऊन आशीर्वाद दिलेत. महंतानी आपण मंत्री झाल्यावर गडावर येऊन वैकुंठवासी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावेत, असा उल्लेख आहे. महंत नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्या या भेटीकडे आता पंकजा मुंडे समर्थक कसे व्यक्त होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 13, 2019, 9:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading