आमच्याकडे होते तेव्हा भ्रष्टाचारी 'बबन्या' आणि भाजपमध्ये गेले की 'बबनराव', व्वा! -मुंडे

आमच्याकडे होते तेव्हा भ्रष्टाचारी 'बबन्या' आणि भाजपमध्ये गेले की 'बबनराव', व्वा! -मुंडे

' विरोधी पक्षातल्या नेत्यांना वेचून वेचून लक्ष्य केलं जातं आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशांचा ससेमीरा लावला जातोय. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही.'

  • Share this:

जिंतूर 22 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या मराठवाड्यात आहे. ही यात्रा आज जिंतूरमध्ये होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या यात्रेसोबत आहेत. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला.

ते म्हणाले, बबनराव पाचपुते हे आज भाजपमध्ये आहेत. ते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजपसाठी त्यावेळी ते 'बबन्या' होते. मात्र पाचपुते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप धुतले गेले आणि ते बबनराव झाले अशी टीकाही त्यांनी केली.

'ठाकरे म्हणजे मराठी माणसाची अस्मिता', जितेंद्र आव्हाडांची आक्रमक प्रतिक्रिया

भाजप राज्यात सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षातल्या नेत्यांना वेचून वेचून लक्ष्य केलं जातं आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशांचा ससेमीरा लावला जातोय. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी सत्तेत असताना फडणवीस आणि भाजपने जे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते फक्त राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठीच होते. नाही तर मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये भ्रष्टाचारी आहेत हे मान्य करावं असं आवाहनही त्यांनी दिलं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे हे शिवस्वराज्य यात्रेवर निघाले असून या यात्रेत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सहभागी होत आहेत.

एकाच रात्रीत चार ATM वर डल्ला, बाइकवरून आले होते भामटे!

तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात्रा काढल्या आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही राज्यात यात्रा काढणार आहेत. कोल्हापुरातल्या महापूराने या सर्व यात्रा थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता सर्व यात्रा पुन्हा सुरू झाल्या असून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 22, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading