औरंगाबादमध्ये डेंग्यूच्या बळींची संख्या 11वर, पालिकेचे धाबे दणाणले

औरंगाबादमध्ये डेंग्यूच्या बळींची संख्या 11वर, पालिकेचे धाबे दणाणले

डेंग्यूबाबत वेळीच उपाय योजना केली गेली नाही तर येणाऱ्या काळात परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ शकते अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 18 नोव्हेंबर : शहरात डेंग्यूच्या साथीचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून आता डेंग्यूच्या बळींची संख्या 11वर गेली आहे. डेंग्यूची साथ वाढतच चालली असली तरी मनपाकडून प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. तर याची गंभीर दखल घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेवून अधिकारी शहरात डेंग्यूच्या उपाययोजने बाबत आदेश दिले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूची साथ शहरात सुरु झाली असली तरी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाला. या महिन्यात पाच जणांचा बळी गेला. त्यांनतरही डेंग्यूची साथ अटोक्यात आली नाही. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात देखील चार जणांचा बळी गेला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 50 वर पोहोचली तर संशयीत 180 रुग्ण आढळून आले आहे. त्यातच मंगळवारी शहरात दोंघाचा मृत्यु झाला. घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात नारेगाव येथील सात वर्षीय बालकास दाखल करण्यात आले होते. डेंग्यू झाल्यामुळे त्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी दुपारी त्या बालकाचा मृत्यु झाला.

नागपुरात काँग्रेसमध्ये राडा, खुर्च्यांची फेकाफेक करत कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

त्याचबरोबर खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गणेश कॉलनीतील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यूच्या बळीची संख्या 11 वर पोहचली आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. अडीच महिन्यापासून डेंग्यूची साथ शहरात सूरू आहे. परंतु आरोग्य विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

डेंग्यूची साथ नियंत्रणात येत नसल्यामुळे आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी सुरु केली आहे. डेंग्यूचा सर्वाधिक धोका असलेल्या भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोनमध्ये असल्याचे जाहिर केले आहे. या भागात वारंवार डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे.

थरार...नगरमध्ये भरदिवसा उद्योगपतीचं अपहरण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पळवलं

शासकीय घाटी रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. डेंग्यूबाबत वेळीच उपाय योजना केली गेली नाही तर येणाऱ्या काळात परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ शकते अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.

First published: November 18, 2019, 7:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading