दुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये डान्सबारची छमछम, बारबालांवर पैशाचा पाऊस!

दुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये डान्सबारची छमछम, बारबालांवर पैशाचा पाऊस!

डान्सबारमधल्या मुलींवर पैसे का उधळत नाही असे म्हणत बार मालकाने एका ग्राहकालाच झोडपून काढलं आणि डान्सबारचं बिंग फुटलं.

  • Share this:

बालाजी निरफळ, उस्मानाबाद,15 ऑगस्ट : मराठवाड्यातला उस्मानाबात हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागात अजुनही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आगे. मात्र असं असतानाही अनेक हॉटेल्समध्ये 'डान्सबार' सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा परिसरात हॉटेल सौदागरमध्ये आर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारची खुलेआम छमछम सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या डान्सबारमध्ये बारबालांवर पैशाचा पाऊस पडत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

बिबट्या मादी आणि तिच्या पिलाच्या भेटीचा चटका लावणारा VIDEO तुम्ही पाहिलाच पाहिजे

स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टच्या मध्यरात्री ड्राय डे असताना देखील हा डान्सबार सुरू होता. या वेळी डान्सबारमधल्या मुलींवर पैसे का उधळत नाही असे म्हणत बार मालक विजय गायकवाड यांनी राजेंद्र जाधव या तरुणाला मारहाण केली. यात राजेंद्र जाधव गंभीर जखमी झाले. उमरगा पोलीस ठाण्यात हॉटेल चालक विजय गायकवाडसह तिघांवरगुन्हा दाखल झालाय. पण अद्याप पर्यंत एकालाही अटक झाली नाही.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं हृदयविकारानं निधन

हाणामारीमुळे डान्सबारचा प्रकार उघड झाला असून कारवाई करताना मात्र पोलिसांनी डान्सबारचा उल्लेख टाळलाय. रहिवासी वस्तीत असलेला हा बार पोलिसांनी बंद करावा अशी मागणी होत आहे. बार चालकाच्या मारहाणीत राजेंद्र जाधव हे जखमी झाले असून त्याने सर्व प्रकार उघड केलाय. या विषयावर पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. तर पोलीसच या डान्सबारला अभय देत असल्याचा आरोप होतोय.

थोरातांना होम पीचवर चितपट करण्यासाठी विखेंचा 'मास्टर स्ट्रोक'

अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर सुप्रीम कोर्टानं डान्सबारवरची बंदी उठवली असली तरी त्यासाठी अनेक नियमही घातले आहेत. कायदेशीर बंदी उठली तरी डान्सबार चालावेत अशी राज्य सरकारची इच्छा नाही. त्यामुळे पोलिसांनी कडक निर्बंध लादले आहेत. असं असतानाही डान्सबार सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या