पांढऱ्या सोन्याची परवड.. व्यापाऱ्यांकडून लूट, शेतकरी दुहेरी संकटात

पांढऱ्या सोन्याची परवड.. व्यापाऱ्यांकडून लूट, शेतकरी दुहेरी संकटात

आठ दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केला जात नसल्याचे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

  • Share this:

बीड,23 डिसेंबर: शासकीय अधिकाऱ्यांच्या व सीसीआय कापूस खरेदी केंद्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. ओल्या दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या या शेतकऱ्याने उरलासुरला कापूस वेचून विक्रीसाठी केंद्राच्या शासकीय खरेदी संस्थेवर घेवून आले. मात्र, आठ दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केला जात नसल्याचे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. वाहन खर्चाचा अतिरिक्त बोजाही शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. अधिकारी या बाबतीत लक्ष देत नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत.

बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील एसआरए जिनिंगमध्ये केंद शासनाचे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अचानक बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या जिनिंगवर 400 गाड्या आणि पाच-सातशे शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून खोळंबून थांबले आहेत. खरेदी केंद्र बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. तसेच बेभाव खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. शेतात हंगामाची काम सुरू असल्यामुळे काम बुडवून कधी नंबर येईल या आशेवर आठ दिवसांपासून बसलेले मोतीराम खांडे हे शेतकरी त्यांची अवस्था सांगत आहे. वाहन उभा केल्यामुळे खोटी द्यावी लगते. त्यामुळे 10 हजारचा तोटा सहन करवा लागणार आहे, असे खांडे यांनी सांगितले. अशीच अवस्था इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांची आहे.

एकीकडे शासकीय खरेदी केंद्र बंद आणि दुसरीकडे व्यापाऱ्याकडून होणारी लूटमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. लवकरात लवकर सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणीही या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सीसीआयचा कापूस खरेदी केंद्र बाबतीत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता यावर बोलण्यास नकार दिला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन कॉल घेतले नाहीत. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनाही विचारणा केली असता आदेश मिळेपर्यंत सीसीआयची केंद्र चालू केले जाणार नाही, असे सांगितले. यामुळे एकूणच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागत आहे. शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून तर त्वरित कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या