धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, माय-लेकांनी उचलल टोकाचं पाऊल

धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, माय-लेकांनी उचलल टोकाचं पाऊल

कोरोनामुळे पतीच्या झालेल्या मृत्यूचा धक्का महिला पचवू शकली नाही.

  • Share this:

औरंगाबाद, 06 ऑगस्ट : कोरोनाचा औरंगाबादमध्ये कहर सुरू असतानाच एक दु:खद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. महिलेनं आपल्या दोन जुळ्या मुलांसह आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पतीच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्यानं या माय-लेकानं टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. आपला आधार असलेला पती या जगात नाही या धक्क्यानं महिलेनं आपल्या दोन जुळ्या मुलांसह आत्महत्या केली आहे. धारदार वस्तून तिघांनी आपल्या हाताची नस कापून आत्महत्या केली. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र महिला आणि मुलीचा मृत्यू झाला होता. तर यामध्ये मुलगा वाचला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा-धक्कादायक! प्रत्येक 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू, कोरोनाचा महाभयंकर टप्पा

कोरोनामुळे पतीच्या झालेल्या मृत्यूचा धक्का महिला पचवू शकली नाही. महिलेनं टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी नातेवाईक त्यांच्या घरी येऊन राहात होते. रात्री जेवण झाल्यानंतर सुसाईड नोट लिहून टोकाचं पाऊल उचललं आहे. आधी गळफास घेण्याचा विचार मनात आला मग तिघांनीही धारदार वस्तूनं आपल्या हाताची नस कापून आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करण्याआधी महिलेनं सुसाईड नोट लिहून नातेवाईकांची माफी मागितली. नातेवाईक आणि शेजारच्यांनी घराचं दार तोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. बेशुद्घ अवस्थेत असलेल्या महिला आणि दोन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी माय-लेकीचा मृत्यू झाला आहे. तर मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 6, 2020, 9:16 AM IST

ताज्या बातम्या