Home /News /maharashtra /

कोरोना योद्धालाच रुग्णवाहिका नाही, पॉझिटिव्ह असतानाही चेकपोस्टवर केली ड्यूटी

कोरोना योद्धालाच रुग्णवाहिका नाही, पॉझिटिव्ह असतानाही चेकपोस्टवर केली ड्यूटी

रात्री कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णवाहिका न आल्याने सकाळपर्यंत चेकपोस्टवर ड्यूटी करून स्वतः दुचाकीवर रूग्णालयात दाखल झाला.

    बीड, 27 जुलै : कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांलाच ॲम्बुलन्स मिळाली नाही म्हणून पॉझिटिव्ह असताना रात्रभर चेक पोस्टवर ड्युटी करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्हयातील परळी इथे उघडकीस आला आहे. या प्रकाराणे आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा उघडकीस आला. रात्री कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णवाहिका न आल्याने सकाळपर्यंत चेकपोस्टवर ड्यूटी करून स्वतः दुचाकीवर रूग्णालयात दाखल झाला. या प्रकरणात संशयित म्हणून स्वॅब देऊनही ड्युटी कशी लावली, पाॅझिटिव्ह आल्यावर ॲम्बुलन्सदेखील वेळेवर मिळाली नाही. यामुळं आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर येत आहे. या संदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हयातील वाढता आकडा त्यात या प्रकारामुळे कोरोना संदर्भात प्रशासनाला गांभीर्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. परळी शहर ठाण्यातील 42 वर्षिय पोलीस कर्मचारी हा बीड-लातूर सीमेवरील जोडवाडी चेकपोस्टवर कर्तव्यास होता. शुक्रवारी त्याचा ‌‌स्वॅब‌ घेण्यात आला होता. त्यानंतरही त्यास शनिवारी ड्युटी देण्यात आली. शनिवारी दिवसभर या कर्मचाऱ्याने अन्य दोन सहकारी आणि एका पोलीस अधिकाऱ्यासोबत जोडवाडी चेकपोस्टवर ड्युटी केली. लॉकडाऊनमध्ये भर दिवसा खुनाचा थरार, तिघांनी एका तरुणाची केली निर्घृण हत्या रात्री उशिरा त्यांना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने कोविड कक्षात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, रुग्णवाहिका मिळाली नाही. पॉझिटीव्ह असतानाही रात्रभर त्या कर्मचाऱ्याने इतरांना लागण होणार नाही. याची काळजी घेत कर्तव्य बजावले आणि सकाळी आठ वाजता सुटी झाल्यानंतर स्वतः गाडी चालवत रुग्णालयात दाखल झाला. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे आज स्वॅब‌ घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. भारतात स्वस्त झाला सगळ्यात प्रसिद्ध android स्मार्टफोन, काय आहे नवी किंमत परळीचा कर्मचारी कोरोना बाधित असल्याची माहिती रात्री उशीरा रुग्णवाहिका मिळाली नाही. त्या संबधित कर्मचाऱ्यांने स्वाईब दिल्याचं इतरांना माहीत नव्हतं. तसेच कोणतेही लक्षण आढळून न आल्याने स्वतः दिवसभर ड्युटीवर होता. सकाळी माझी गाडी कोण घेऊन येईल म्हणून स्वतः गाडी चालवत तो हॉस्पिटलमध्ये गेला. या प्रकरणात कोणताही हलगर्जी पणा झाला नाही. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली. झाल्या प्रकाराने परळीत संताप व्यक्त केला जात आहे. त्या बरोबरच हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या