औरंगाबादेत थरार.. हॉटेलमध्ये चहा पिणाऱ्या ठेकेदाराची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या

सुभान बुधवारी रात्री उस्मानपुरा भागातील शहानुरमिय्या दर्गा चौकातील रमजानी हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पित गप्पा मारत बसला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 03:25 PM IST

औरंगाबादेत थरार.. हॉटेलमध्ये चहा पिणाऱ्या ठेकेदाराची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,31 ऑक्टोबर: शहारातील शहानूर मिय्या दर्गा चौकात थरारक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये चहा पित बसलेल्या तरुण ठेकेदाराच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. शेख सुभान शेख अमिर असे हत्या झालेल्या तरुण ठेकेदाराचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, सुभान बुधवारी रात्री उस्मानपुरा भागातील शहानुरमिय्या दर्गा चौकातील रमजानी हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पित गप्पा मारत बसला होता. त्याचवेळी मारेकरी शेख नईम शेख सलीम उर्फ गोरू हा त्याचे दोन भाऊ शेख अलीम उर्फ बच्चू, शेख समीर यांच्यासह हॉटेलमध्ये आला. काही समजण्याच्या आतच गोरूने सोबत आणलेल्या धारधार कुऱ्हाडीने पाठीमागून सुभानच्या डोक्यात वार केला. कुऱ्हाडीचा प्रहार बसताच सुभान रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्याला बेशुद्धावस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री दोन वाजेच्या सुमारास सुभानचा मृत्यू झाला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून गोरूने ही हत्या केल्याचे समोर येत आहे.

उसणवारीचे पैसे मगितल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून

अशीच एक धक्कादायक घटना (खर्डा, जि.अहमदनगर) येथे घडली आहे. उसणवारीचे पैसे मागितले म्हणून एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाळू बजरंग पवार (वय-40, रा. कोष्टी गल्ली, खर्डा, ता.जामखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा गावात तणाव परसला आहे. या प्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

मिळालेली माहिती अशी की, मृत बाळू पवारची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. सर्व आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या बाळूचा मृतदेह खर्डा येथे आहे. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल करण्यात आले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण, निलेश कांबळे खर्डा गावात तळ ठोकून आहेत.

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...