Home /News /maharashtra /

मंत्रिपद न मिळाल्याने जालन्याचे काँग्रेस आमदारही नाराज, देणार राजीनामा?

मंत्रिपद न मिळाल्याने जालन्याचे काँग्रेस आमदारही नाराज, देणार राजीनामा?

मंत्रिपद न मिळाल्याने जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्यालसह कार्यकर्त्यांत मोठी नाराजी असल्याने समोर आले आहे.

जालना,4 जानेवारी: कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार पाठोपाठ आता मंत्रिपदासाठी जालन्यात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त करत बंडाचा झेंडा फडकावला आहे. आमदार कैलास गोरंट्याल हे राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्यालसह कार्यकर्त्यांत मोठी नाराजी असल्याने समोर आले आहे. मराठवाड्यातील घराणेशाही ने त्यांचा पत्ता कट केला असल्याचा आरोप कार्यकर्त्याकडून केला जात आहे. गोरंटयाल समर्थकांनी आक्रमक कार्यकर्त्यांनी शनिवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते हाताला काळ्या फिती बांधून बैठकीला हजर झाले आहेत. या बैठकीत कार्यकर्ते काय निर्णय घेता याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गोरंट्याल घेतील, तो निर्णय मान्य असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी बंडाला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे सरकारला पहिला धक्का, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा दरम्यान, राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला शनिवारी मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज होते. या पार्श्वभूमीवरच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. खातेवाटपाचं गुऱ्हाळ खातेवाटपावरून महाआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता होताना दिसत नव्हती. मात्र आता अखेर काँग्रेसला चार वाढीव खाती दिल्यानंतर आज काँग्रेसची यादी दिल्लीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची खातेवाटपाबाबत शुक्रवारी रात्री बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत पक्षाच्या वाट्याला आलेल्या खात्यांच्या वाटणीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही एकत्रित यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्याला राज्यपाल यांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर आज दुपारपर्यंत खातेवाटपाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Congress MLA, Jalna news, Udhav thackeray

पुढील बातम्या