चंद्रावर जाऊन तरुणांचं पोट भरणार का? राहुल गांधींचा मोदींना सवाल!

चंद्रावर जाऊन तरुणांचं पोट भरणार का? राहुल गांधींचा मोदींना सवाल!

भाजपने नोटबंदी, जीएसटी लागू करून देशातल्या उद्योगाचा सत्यानाश केला. त्यामुळे देशात मंदी आली.

  • Share this:

औसा, 13 ऑक्टोंबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विधानसभेच्या प्रचारात आज महाराष्ट्रात पहिली सभा घेतली. मराठवाड्यातल्या औसा इथं त्यांची पहिली सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकरी, बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी, या खऱ्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे काश्मीर आणि पाकिस्तान सारखे मुद्दे उपस्थित करत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजप आणि त्यांचे नेते हे समाजाचं विभाजन करत आहेत. हे विभाजन जेवढं वेगात होईल तेवढी अर्थव्यवस्था तळाशी जाईल असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस ही या देशाची विचारधारा असून तोच देशाचा आत्मा आहे. राज्यात काँग्रेसचाच विजय होईल असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार राजकारणातले 'नटरंग', त्यामुळेच ते 'हातवारे' करताहेत - मुख्यमंत्री

राहुल गांधी पुढे म्हणाले, आम्ही खोटं आश्वासनं देणार नाही. जे बोलू ते करून दाखवू. भाजपने नोटबंदी, जीएसटी लागू करून देशातल्या उद्योगाचा सत्यानाश केला. त्यामुळे देशात मंदी आली. आज चीनचा माल देशात येतोय. मेक इन इंडियाची फक्त घोषणा करण्यात आली, मात्र झालं काहीच नाही. उलट तरुणांचा रोजगार गेला असंही ते म्हणाले. इस्रोची निर्मिती काँग्रेसने केलीय. उपग्रह चंद्रावर सोडून तरुणांचं पोट भरणार नाही अशी टीकाही त्यांनी केली. देशातले 2 हजार कारखाने बंद पडले आहेत अस आरोपही त्यांनी केला.

चीनच्या राष्ट्रपतींशी मोदींनी गप्पा केल्या पण त्यांना एकही अवघड प्रश्न विचारला नाही. डोकलामध्ये चीनचं सैन्य कसं आलं असा प्रश्न त्यांनी विचारला का असा प्रश्नही त्यांनी विचारला. मोठ्या उद्योगपतींचं लाखोंचं कर्ज माफ करण्यात आलंय. मात्र शेतकऱ्यांना भाजपच्या सरकारने काहीही दिलेलं नाही. उद्योगपती कर्ज घेतात बुडवतात आणि पळून जातात, शेतकऱ्यांना मात्र नाडलं जातं.

40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

भाजपचं सरकार त्यांचं एकही आश्वासन पूर्ण करू शकलं नाही. फक्त घोषणा देऊन, भुलथापा देऊन लोकांना फसवलं जातंय असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी आणखीही सभा राज्यात घेणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. मुख्यमंत्री आपल्या भाषणात सातत्याने  राहूल गांधींना टार्गेट करताहेत. राहुल हे निवडणूक सोडून परदेशात गेले आहेत. ते प्रचारात दिसत नाहीत अशी टीका होत असताना राहुल गांधींनी सभा घेत मोदींना टार्गेट केलंय.

First published: October 13, 2019, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading