'मुख्यमंत्री पाहिजे.. नियम व अटी लागू', औरंगाबादेत झळकली जाहिरात

'मुख्यमंत्री पाहिजे.. नियम व अटी लागू', औरंगाबादेत झळकली जाहिरात

मुख्यमंत्रिपदासाठी काही नियम व अटी सुद्धा जाहिरातीच्या बॅनरवर लिहिण्यात आल्या.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 21 नोव्हेबर: मराठा क्रांती ठोक मोर्चाने औरंगाबादेत अनोखे आंदोलन छेडण्यात आले. मुख्यमंत्री (CM) पाहिजे, अशा जाहितातीचे बॅनरही झळकले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने क्रांती चौकात गुरुवारी आंदोलन केले. मराठा कार्यकर्त्यांनी आपल्या चेहऱ्यावर विविध नेत्यांचे मुखवटे लावले होते. राज्याला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पाहिजेत, अशा जाहिरातीचे बॅनर हातात घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्रिपदासाठी काही नियम व अटी सुद्धा जाहिरातीच्या बॅनरवर लिहिण्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरेंविरुद्ध पोलिसांत तक्रार... तक्रारदार म्हणाला, 'माझं मत वाया गेलं'

भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळवली आणि सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून फसवणूक केल्याचे तक्रारदार रत्नाकर भीमराव चौरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रत्नाकर चौरे यांनी केली आहे.

'माझं मत वाया गेलं'

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाशिवआघाडी करून सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. तक्रारदार रत्नाकर चौरे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने महायुतीच्या नावाखाली मत मिळवली आणि आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यामुळे आमची फसवणूक झाल्याचे रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला होता. हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी शिवसेना-भाजप महायुतीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेऊन महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले. निकालानंतर महायुतीसोबत सरकारही स्थापन केले नाही. शिवसेनेने भाजपशी युती तोडली. त्यामुळे मी भाजप समर्थक आणि हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी केलेले मतदान वाया गेले आहे. हिंदुत्त्वाच्या नावे मते मागून उद्धव ठाकरे यांनी माझी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

First published: November 21, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading