Home /News /maharashtra /

'थिल्लरपणावर बोलण्यासाठी वेळ नाही'  फडणवीसांना टोला हाणत खडसेंबद्दलही बोलले मुख्यमंत्री

'थिल्लरपणावर बोलण्यासाठी वेळ नाही'  फडणवीसांना टोला हाणत खडसेंबद्दलही बोलले मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

'एकनाथ खडसे महाआघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी पक्षाची पाळमुळ खोलवर नेलीत.'

तुळजापूर 21 ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीही पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आढावा घेतला. नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नुकसान मोठं आहे, लवकरात लवकर मदत देऊ, सर्व नुकसानीला मदत देऊ. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जे करायचे ते ठोस करायचे हा माझा स्वभाव आहे असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्री म्हणाले, थिल्लर-चिल्लरपणावर बोलण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. त्यांचं काय ते चालू द्या. मला माझ्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. सध्या सगळा वेळ त्यासाठीच देतोय. इतर गोष्टींवर बोलण्यात वेळ घालवणार नाही असा टोला त्यांनी लगावला. एकनाथ खडसे महाआघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी पक्षाची पाळमुळ खोलवर नेलीत असंही मुख्यमंत्री म्हणाले. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही. पैश्याच सोंग घेता येत नाही. जीएसटीचे पैसे मिळाले असते तर लगेच मदत देऊ शकलो असतो असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. युती कोणी तोडली? एकनाथ खडसे यांनी केला खुलासा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्ष सोडत असताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसंच, भाजप-शिवसेनेची युती तोडण्याचा निर्णय आपण घेतला नसल्याचेही सांगितले. एकनाथ खडसे यांनी आज दुपारी मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप पक्ष सोडत असल्याची अखेर घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी शिवसेना आणि भाजप युती तोडण्याचा निर्णय कुणाचा होता असा सवाल विचारला असता खडसेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'त्यावेळी भाजप शिवसेना युती तोडण्याचा निर्णय हा माझ्या एकट्याचा नव्हता. हा सामूहिक निर्णय होता. मी पक्षाच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो म्हणून मला घोषणा करावी लागली', असं खडसे यांनी स्पष्ट केले.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या