Home /News /maharashtra /

मंदिराच्या बाहेरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलं आई तुळजाभवानीचं दर्शन, पाहा VIDEO

मंदिराच्या बाहेरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलं आई तुळजाभवानीचं दर्शन, पाहा VIDEO

कोरोनाची प्रसार रोखण्यासाठी सरकारने जे नियम केले होते त्यानुसार सध्या मंदिरं ही बंदच आहेत. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनाच देवीच्या मंदिराबाहेरून दर्शन घ्यावं लागलं.

तुळजापूर 21 ऑक्टोबर: मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी तुळजापूरात होते. सकाळी पावासामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर दुपारी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. सध्या नवरात्रही सुरू आहे. मात्र मंदिरं खुली ठेवण्यास सरकारची परवानगी नसल्याने मंदिराचं दार बंदच आहे. मुख्यमंत्री मंदिराच्या महाद्वाराजवळ गेले आणि तिथेच त्यांनी पूजा आणि आरती करत देवीचं बाहेरूनच दर्शन घेतलं. नवरात्रीचा उत्सव त्यात तुळजापूरचा दौरा त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  भवानी मातेच्या दर्शनाला गेले नसते तरच नवल. कोरोनाची प्रसार रोखण्यासाठी सरकारने जे नियम केले होते त्यानुसार सध्या मंदिरं ही बंदच आहेत. मंदिरं सुरू झाली तर लोकांची गर्दी होईल आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मंदिर सध्या बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भाजपने या प्रश्नावरून राज्य सरकार विरुद्ध राज्यभर आंदोलन केलं होतं. हॉटेल्स, बार, दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जाते मग देवांच्या मंदिरांना का नाही असा सवाल भाजपने केला होता. मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता मंदिरं खुली न करण्याचा निर्णय राज्य सरकारने कायम ठेवला आहे. पत्रकार परिषदेत काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीही पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आढावा घेतला. नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नुकसान मोठं आहे, लवकरात लवकर मदत देऊ, सर्व नुकसानीला मदत देऊ. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जे करायचे ते ठोस करायचे हा माझा स्वभाव आहे असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्री म्हणाले, थिल्लर-चिल्लरपणावर बोलण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. त्यांचं काय ते चालू द्या. मला माझ्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. सध्या सगळा वेळ त्यासाठीच देतोय. इतर गोष्टींवर बोलण्यात वेळ घालवणार नाही असा टोला त्यांनी लगावला. एकनाथ खडसे महाआघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी पक्षाची पाळमुळ खोलवर नेलीत असंही मुख्यमंत्री म्हणाले.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या