ब्रेन डेड तरुणाचे अवयव नेण्यासाठी आलेले चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरले

अवयव घेऊन जाण्यासाठी आलेले चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरले. विमान धावपट्टीवरून थेट बाजूच्या गवतात शिरले.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 11:27 AM IST

ब्रेन डेड तरुणाचे अवयव नेण्यासाठी आलेले चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरले

मुजीब शेख,(प्रतिनिधी)

नांदेड, 12 सप्टेंबर: अवयव घेऊन जाण्यासाठी आलेले चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरले. विमान धावपट्टीवरून थेट बाजूच्या गवतात शिरले. विमानातील डॉक्टरांचे पथक, पायलट, को पायलट होते. सगळे थोडक्यात बचावले. बुधवारी रात्री 12 वाजता ही घटना घडली. यावेळी पाऊस सुरू होता.

मिळालेली माहिती अशी की, ब्रेन डेड झालेल्या तरुणाचे अवयव नेण्यासाठी मुंबईहून एक एअर अॅब्युलन्स आणि एक चार्टर्ड विमान नांदेडला आले होते. एअर अॅब्युलन्स सुखरूप उतरले. परंतु चार्टर्ड विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले. विमान थेट धावपट्टीच्या बाजूला असलेल्या गवतात शिरले आणि चिखलात फसले. अपघात घडताच विमानतळावरील कर्मचारी अधिकारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या विमानात असलेले काही डॉक्टर, पायलट ,को पायलट यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त विमान चिखलातून बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडून अत्यंत गोपनियता पाळली जात आहे. विमानाचा अपघात नेमका कसा झाला. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समजू शकली नाही. या 2 विमानांच्या मदतीने मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हृदय तर अपोलो हॉस्पिटलमध्ये लिव्हर नेले जाणार होते. दुर्दैवाने हे विमाने नांदेडला पोहोण्याआधीच अवयवदाता ओम काळे (वय-22) याची प्राणज्योत मालवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

VIDEO: आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2019 11:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...