'धनंजय मुंडे हे फक्त चमको आणि टपोरीगिरी करण्यात वस्ताद'

'धनंजय मुंडे हे फक्त चमको आणि टपोरीगिरी करण्यात वस्ताद'

'राज्यात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि MIM हेच आघाडीवर असून त्यांच्याशीच भाजप-शिवसेनेची खरी लढत आहे.'

  • Share this:

सुरेश जाधव24 सप्टेंबर : राज्यांत काँग्रेस-राष्ट्रवादी हुडकून सापडणार नाही. बीड मतदार संघातच नाही तर राज्यांत असच चित्र आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे फक्त चमको आणि टपोरीगिरी करण्यात वस्ताद आहेत अशी बोचरी टीका शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली. राज्यात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि MIM हेच आघाडीवर असून त्यांच्याशीच भाजप-शिवसेनेची खरी लढत आहे असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची गळती सुरूच आहे त्याच्या पक्षात फार कुणी राहणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी औषधालाही शिल्लक राहणार नाही अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. आम्ही तसेच विकासच्या मुद्यांवर निवडणूक लढवत आहोत. बीड विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत, सूतगिरणी, शिक्षण संस्था दूध संघ, बाजार समिती आणि नगर पालिकेच्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली.

येत्या पुढच्या  कालवधीत बीडचा दुष्काळ हा भूतकाळ करण्यासाठी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. नगरपालिकेच्या पुढील पन्नास वर्षाचा विचार करुन अमृत अटल पेय जल योजना तसच भुयारी गटारी योजना राबवत आहोत असंही त्यांनी सांगितलं.

लोकसभेत तोंडावर आपटलात, आता झाकली मुठ ठेवा; तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

वंचितची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. सगळ्यांना वंचितच्या यादीची प्रतिक्षा होती. MIMशी काडीमोड घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागा वाटपावरून न पटल्याने 'आप'नेही वंचितशी जास्त चर्चा न करता उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे 'वंचित' आता स्वबळावर सगळ्या जागा लढण्याची शक्यता आहे. लोकसभेत वंचितने उमेदवार देताना त्यांच्या जीतीही दिल्या होत्या. त्यामुळे वादही निर्माण झाला होता. आता विधानसभा निवडणुकीतही वंचितने उमेदवारांची जात जाहीर केलीय. सर्व जातींना सामावून घेण्यासाठीच जात जाहीर केल्याचा दावा वंचितने केला होता.

राष्ट्रवादीतून उदयनराजेंविरोधात कोण? पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना वेग

प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेगवेगळ्या समूहाला आम्ही प्रतिनिधींत्व दिलेलं आहे आणि हे लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून आम्ही जात उमेद्वारांसमोर जात लिहिली आहे. जात कागदावर लिहिणं गरजेचं आहे.  इतर पक्षांना स्वतःबद्दल असणारे अवास्तव समज  आणि समोरच्या ताटातील मुख्य खाद्यपदार्थ पळवण्याची वृत्ती यामुळे कुणाबरोबर आघाडी होत नाहीये. ज्याचं अस्तित्व नाही असे आम्हाला राजकारण शिकवायला लागले तर आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि  तुमचं राजकारण तुम्हीच करा असं सांगतो.

विधानसभेच्या एण्ट्री आधीच राज ठाकरे भाजपच्या टार्गेटवर, 'कोहिनूर मिल'वर टीका

एमआयएम ने स्वतःचा रस्ता स्वतः निवडला, पण आम्ही आजही बोलायला तयार आहोत. त्यांचा प्रतिसाद आम्हाला हवा तसा नाही, ते माध्यमातून बोलत आहेत, प्रत्यक्षात ते का बोलत नाहीत. आप ने चर्चा  होण्याआधीच त्यांनी आपली यादी जाहीर केली, त्यांना आम्ही जागाही वाढवून दिल्या. आम्ही सगळ्या जागांवर निवडणूक लढवणार. या यादीत 4 मुस्लिम उमेदवार आहेत .मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उमेदवार येतोय आणि आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे च्यामुळे मतांच विभाजन होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 06:07 PM IST

ताज्या बातम्या