अरेरे...कोरोनाच्या भीतीने शेतात गेलेल्या मामा-भाच्यांचा बुडून मृत्यू

अरेरे...कोरोनाच्या भीतीने शेतात गेलेल्या मामा-भाच्यांचा बुडून मृत्यू

कोरोनाची भीती आणि लॉकडाउनमुळे शहरांमध्ये नोकरीसाठी आलेले अनेक जण गावाकडे गेले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातली सरकारने तपासणी मोहिम सुरू केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद 27 मार्च : कोरोनामुळे देशभर लॉकडाउन आहे. त्याच्या आधीच शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. त्यामुळे अनेक घरांमधली बच्चेमंडळी ही आपल्या गावी गेली, काही जण मामांच्याही गावाला गेले. मात्र मामाच्या गावाला गेलेले दोन भाचे आणि मामा यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्हयात घडली आहे.

श्यामराव राठोड हे सोयगाव तालुक्यातल्या मोलखेडा इथं राहतात. शाळेला सुट्टी असल्याने त्यांचा भाचा ओम प्रकाश चव्हाण (वय10) आणि त्याची बहिण पल्लवी प्रकाश चव्हाण (12) हे त्यांच्याकडे आले होते.

श्यामराव मामांनी आपल्या भाचांना बैलगाडीतून शेतात नेलं होतं. घरी परतत असताना बैलांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी बैलगाडी शेताजवळ असणाऱ्य पाझर तलावाजवळ नेली. बैलगाडी थांबवून बैल पाण्याजवळ न नेता त्यांनी थेट गाडीच पाण्यात टाकली. तिथे पाणी खोल होतं आणि पाण्यात गाळही होता.

हे वाचा - परप्रांतीय 40 मजुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, 3 दिवसांपासून सर्व उपाशी

त्या गाळात गाडी फसली आणि पलटी झाली. त्यामुळे तिघेही पाण्यात आपडले आणि त्यांचा मृत्यू झाला. यात एका बैलाचाही अंत झाला. गावकऱ्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं आहे. पोलिसांनी आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.

कोरोनाची भीती आणि लॉकडाउनमुळे शहरांमध्ये नोकरीसाठी आलेले अनेक जण गावाकडे गेले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातली सरकारने तपासणी मोहिम सुरू केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला शहरातून येणाऱ्या लोकांची यादी तयार करायला सांगितलं असून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

हे वाचा - Inside Story : सांगलीमध्ये 'कोरोना'चा गुणाकार, आधी 4 आता 12 जण पॉझिटिव्ह

त्याच बरोबर त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शहरातली लागण ग्रामीण भागात होऊ नये यासाठी सरकार ही काळजी घेत आहे.

First published: March 27, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या