'भाजपचं सरकार राज्यांत पुन्हा येणार, हा नेता 100 टक्के मंत्री होणार'

'भाजपचं सरकार राज्यांत पुन्हा येणार, हा नेता 100 टक्के मंत्री होणार'

'तीन पक्षांची महाविकास आघाडी ही आघाडी नाही तर बिघाडी आहे. हे सरकार फार काळ टिकणारं नाही.'

  • Share this:

बीड 03 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात पुन्हा येणार आणि आ.सुरेश धस हे 100% कैबिनेट मंत्री होणार असा दावा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. ते बीड जिल्ह्यातील कुसळंब येथे आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित अण्णा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी तें बोलत होते. या आधीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा अनेकदा केला होता. दरेकरांच्या या दाव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरेकर म्हणाले, विरोधीपक्ष नेता मी असलो तरी शेती मातीच्या प्रश्नाचं मार्गदर्शन आमदार सुरेश धस करतात. जनसंपर्क कार्यकर्ता आपुलकी आणि नेतृत्व घडवणारा नेता म्हणून ओळख निर्माण झाली. येवढेच नाही तर मला विरोधीपक्ष नेता सुरेश धस अण्णानी केले आहे अशी कबुलीही प्रवीण दरेकर यांनी दिली. भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा येणार आहे. 'तीन पक्षांची महाविकास आघाडी ही आघाडी नाही तर बिघाडी आहे. हे सरकार फार काळ टिकणारं नाही.' त्यावेळी आ.सुरेश धस हे कैबिनेट मंत्री 100% होणार असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

अखेर ठरलं...घुसखोरांविरुद्ध मनसेचा मोर्चा निघणार, हा आहे मार्ग

दरेकर पुढे म्हणाले, शेतकरी ग्रामीण भागातील प्रश्न संवेदशीलपणे मांडणारे धस यांनी यांनी महसूल राज्य मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. मंत्री नसताना पाच माणसं नसतात मात्र मंत्रिपदापेक्षा मोठी कमाई माणसाच प्रेम आहे तें धस यांना मिळाली आहे.

बिबट्याच्या 'सावजा'वर कोंबडी चोराने मारला डल्ला

दुष्काळ महापूर सामना कशा करावा याचं तंत्र यांना माहीती आहे. मुंब्रा बँक प्रकरणात धस मंत्री असतांना तारांकित प्रश्नावर क्लीन चिट दिल्याचा ऊलेख करत धस हा महाराष्ट्राचा उदयोन्मुख नेता आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

First published: February 3, 2020, 3:28 PM IST

ताज्या बातम्या