भाजप विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षाकडे सापडले गावठी पिस्तूल

भाजप विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षाकडे सापडले गावठी पिस्तूल

गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या उच्च शिक्षित अनिरुद्ध शेळके याला जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी अटक केली

  • Share this:

विजय कमळे पाटील,(प्रतिनिधी)

जालना,6 डिसेंबर:भाजप विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षाला गावठी पिस्तूल सापडल्याने खळबळ उडाली आहे. गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या उच्च शिक्षित अनिरुद्ध शेळके याला जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूल, एक दुचाकीसह 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली.

अनिरुद्ध शेळके हा भाजप विद्यार्थी आघाडीचा उपाध्यक्ष आहे.

शेळके याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे गावठी पिस्तूल आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील गावठी पिस्तूल, मोबाइल आणि दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी दिली आहे.

ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील मसलगा ते गोर रस्त्यावर हायवा ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र या दोघांची उशिरापर्यंत ओळख पटू शकली नव्हती.

पोलिस आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार निलंगा तालुक्यातील मसलगा ते गौर रस्त्यावर वाळूची वाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. भरधाव जाणाऱ्या या वाहनामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर हायवा ट्रकचालक फरार झाला. त्यामुळे अपघातात कोणाची चूक होती हे कळू शकले नाही. अपघाताचा आवाज येताच परिसरातील शेतकरी धावून आले. मात्र दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या