Elec-widget

अमित देशमुखांची कोंडी करण्यासाठी भाजपची खेळी, लातूर काँग्रेसमध्ये भूकंप?

अमित देशमुखांची कोंडी करण्यासाठी भाजपची खेळी, लातूर काँग्रेसमध्ये भूकंप?

कसभा निवडणुकीपासून भाजपने थेट काँग्रेसच्या नेतृत्वाचीच कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.

  • Share this:

लातूर, 2 ऑक्टोबर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांची कोंडी करण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. अमित देशमुख यांच्याविरोधात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीपासून भाजपने थेट काँग्रेसच्या नेतृत्वाचीच कोंडी करण्याची रणनीती आखली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांच्या नांदेड मतदारसंघात कोंडी केली. परिणामी चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही भाजपचे यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या संगमनेर मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यानंतर आता अमित देशमुख यांचीही कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण 52 उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, नागपूर दक्षिण मधून गिरीष पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर लातूरमधून दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत अमित देशमुख यांना लातूर शहरातून उमेदवारी जाहीर झाली आहे. आतापर्यंत काँग्रेसने जवळपास 103 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

धीरज देशमुख मैदानात

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज यांना अखेर उमेदवारी मिळाली आहे. लातूर ग्रामीणमधून ते आपलं नशीब आजमावून पाहणार आहे. 2014 च्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता परंतु, त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. यंदा मात्र, एकाच घरात दोन्ही भावांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

Loading...

VIDEO : सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, 'शिवसेनेची लोकं आली का?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...