नांदेडमध्ये 9 जगांसाठी 100 अर्ज; पण नोकरीसाठी नाही तर...

नांदेड मध्ये 2014 पुर्वी भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्या येवढी होती. पण आता भाजपाकडे सर्वाधीक गर्दी दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 04:46 PM IST

नांदेडमध्ये 9 जगांसाठी 100 अर्ज; पण नोकरीसाठी नाही तर...

मुजीब शेख, नांदेड 5 सप्टेंबर : महाराष्ट्रात आता आठवडाभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केलीय. भाजपने मुलाखतींना सुरूवात केली असून सगळ्यात जास्त प्रतिसाद त्यांना मिळतोय. राज्यातली हवा लक्षात घेऊन हौसे,नवसे आणि गवसे अशा सगळ्याच प्रकारातली मंडळी भाजपच्या मुलाखतींसाठी जात असून नांदेड विभागात 9 जागांसाठी तब्बल 100 अर्ज आले आहेत. पक्षात तिकीट इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने भाजपपुढच्या अडचणी वाढणार आहेत. आज नांदेड मध्ये राज्यमंत्री रणजीत पाटिल यांनी भाजपाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नांदेडच्या 9 विधानसभेच्या जागांसाठी 100 हुन अधीक इच्छुकांनी मुलाखत दिली. नांदेड मध्ये 2014 पुर्वी भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्या येवढी होती. पण आता भाजपाकडे सर्वाधीक गर्दी दिसत आहे. एका आगेसाठी 10 हुन अधीक इच्छुक उमेदवार बाशींग बांधुन तयार आहेत.

गणेशोत्सव..पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई; तलवारी, चॉपर जप्त

विशेष म्हणजे भाजपाचा विद्यमान आमदार असलेल्या जागेवरही इच्छुक नुसते मुलाखत देत नाहीत तर जोरदार फिल्डींग लावतांना दिसताहेत. भाजपाचे एकमेव आमदार असलेल्या तुषार राठोड यांच्यावरील नाराजीचा फायदा घेण्यासाठी सनदी अधिकारी असलेले रामदास पाटील तिकिटासाठी लॉबींग कराताहेत. त्यांनी ऊमेदवारीसाठी मुलाखतही दिली. एकुणच नांदेड मध्ये मोजके नेते आणि कार्यकर्ते असलेल्या भाजपाला आता अच्छे दीन आले आहेत अशी चर्चा आहे.

मदान मुख्य निवडणूक आयुक्त

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. प्रशासनात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. आता काही महिन्यांवर राज्यातल्या निवडणुका आल्या आहेत. काही दिवसांमध्येच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभीवर निवडणुकीची सर्व जबाबदारी आता मदान यांच्यावर असणार आहे.

Loading...

प्रशासनाच्या विरोधात 'पिंपरी'त विरोधकांनी महापालिकेतच घातली 'पंगत'!

मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...