अमित शहांनी 370 वरून पवारांना पुन्हा घेरलं; म्हणाले, मतदारच जाब विचारतील

अमित शहांनी 370 वरून पवारांना पुन्हा घेरलं; म्हणाले, मतदारच जाब विचारतील

'शरद पवार हे सभागृहात एक आणि लोकांमध्ये दुसरी अशी पवार भूमिका घेतात, लोकांनीच आता त्यांना जाब विचारावा.'

  • Share this:

तुळजापूर 10 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची तोफ धडधडत आहे. गुरुवारी त्यांच्या राज्यात झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवारांना जोरदार टार्गेट केलं. जनतेच्या भावना लक्षात आल्याने अमित शहा आपल्या प्रत्येक सभेत 370चा मुद्दा उपस्थित करत विरोधकांवर तुटून पडत आहेत. तुळजापूर इथं झालेल्या सभेतही त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर टीका केली. निवडणुकीत प्रचारासाठी आल्यावर मतदारांनी शरद पवारांना 370 वर त्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगितली पाहिजे. सभागृहात एक आणि लोकांमध्ये दुसरी अशी पवार भूमिका घेतात असा आऱोपही त्यांनी केला. शहा म्हणाले, राहुल गांधीही काश्मीरच्या निर्णयाला विरोध करताहेत. काँग्रेसने कायम फुटीरतावाद्यांनाच समर्थन दिलंय. बालाकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि राहुल गांधी या दोघांनीही पुरावे मागितले होती असं सांगत त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली.

अमित शहा समजदार नेते; 'हमारी मुख्यमंत्री....' घोषणेवर पंकजांनी दिलं उत्तर

आज सकाळी अमित शहा यांनी  भाजपचे उमेदवार  विलासराव जगताप यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. यावेळी बोलताना अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री अहोरात्र झटत आहेत. मला रात्री 12 वाजता फोन आला की मी समजतो हा देवेंद्र फडणवीसांचाच फोन आहे असा किस्साही त्यांनी सांगितला.

शहा पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षित भारत तयार केलाय तर फडणवीस विकसित महाराष्ट्र तयार करताहेत. फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, रात्री 12 वाजता फोन आला की मला समजत की फडणवीस यांचा फोन असेल. सध्या महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकाकडे वाटचाल सुरू आहे असंही ते म्हणाले.

अजित दादांना विजयी करण्यासाठी सर्व कुटुंबच उतरलं प्रचारात!

ते पुढे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी ची अवस्था अतिशय वाईट आहे. 70 वर्षांच्या राजकारणात 370 कलम कुणी हटवलं नाही. 370 हटवून देशाला अखंड ठेवण्याचे काम मोदींनी केलं. सरदार पटेल यांचे स्वप्न साकार झालं. 370 हटवायला काँग्रेस राष्ट्रवादीने विरोध केला होता. 370 कलम हटविण्याबाबात तुमची काय भूमिका आहे ते शरद पवारांनी जाहीर करावं असं आवाहनही त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 05:19 PM IST

ताज्या बातम्या