पूरग्रस्तांची डोकी भडकवण्याचे काम विरोधकांचे, सुरेश धसांचा गौप्यस्फोट

पूरग्रस्तांची डोकी भडकवण्याचे काम विरोधकांचे, सुरेश धसांचा गौप्यस्फोट

आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांच्या दुःखाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणत झाला. आपत्तीच्या काळात राजकारण करायला नको होतं. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोक नैसर्गिक संकटात असताना त्यांना भडकवण्यात आले.

  • Share this:

बीड, 17 ऑगस्ट- आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांच्या दुःखाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणत झाला. आपत्तीच्या काळात राजकारण करायला नको होतं. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोक नैसर्गिक संकटात असताना त्यांना भडकवण्यात आले. पूरग्रस्तांना चिथावणी देण्याचा प्रयत्न विरोधीपक्षातील नेत्यांनी केल्याचे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवलेही असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री आणि आमदार सुरेश धस यांनी केला आहे. आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये 'न्यूज 18 लोकमत'शी संवाद साधला.

बीड, लातूर, उस्मानाबाद विधान परिषदेचे आमदार तथा माजी मंत्री सुरेश धस हे सांगली-कोल्हापूर मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आठ दिवस ठाण मांडून होते. प्रत्यक्ष रेस्क्यूमध्ये त्यांनी सहभाग घेऊन त्यांनी अनेकांना वाचवले. या आठ दिवसांच्या कालवधीत आलेले अनुभव सांगताना त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. पूरग्रस्तांच्या दु:खाचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा प्रयत्न विरोधकांनी मोठ्य़ा प्रमाणात केला.आपत्तीच्या कालवधीत राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. आपत्ती ग्रस्तव्यक्ती कोण्या पक्षाचा कार्यकर्ता आहे की नाही याचा विचार केला नाही पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सांगली-कोल्हापूरमध्ये माध्यमांचे प्रतिनिधी आले की, काही विशिष्ट पक्षाचे नेतेच पुढे येऊन सरकार कसे अपयशी ठरले आहे, हतबल आहे, हे सांगत होते. तसेच त्या ठिकाणी आरडा-ओरडा कसा होईल, हाच यामागे त्याचा हेतू होता. हे मी प्रत्यक्षपणे अनुभवले आहे, असे सुरेश धस म्हणाले. लोकशाहीने विरोधकांनाही बोलण्याचा अधिकार दिला आहे. आपत्तीच्या काळात सूचना करा. पण पूरग्रस्तांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन विरोधकांनी आपली संधी साधली. राजकारण केले. अशा पक्षाची नावे आपल्याला माहीत आहेत. आपल्याला अशा वागण्याची चीड येते, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोल्हापुरात पूरग्रस्तांमध्ये हाणामारी, काय घडलं नेमकं पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 09:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading