मामा-भाच्यातील वाद पेटला! भाजप नेत्याचा भाचा 2 वर्षांसाठी तडीपार

मामा-भाच्यातील वाद पेटला! भाजप नेत्याचा भाचा 2 वर्षांसाठी तडीपार

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू आहेत. जालना जिल्ह्यात भाजप नेत्याच्या घरातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

  • Share this:

जालना, 27 डिसेंबर: राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू आहेत. जालना जिल्ह्यात भाजप नेत्याच्या घरातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे (BJP MLA Narayan Kuche, Badanapur, jalna) यांचा भाचा दीपक डोंगरे (Deepak Dongare) याच्यावर जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

विविध गुन्ह्यातील आरोपी असलेल्या दीपक डोंगरे याला 2 वर्षांसाठी जालना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. मात्र, या कारवाई मागे मामा अर्थात आमदार नारायण कुचे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भाचा अर्थात दीपक डोंगरे याने केला आहे.

हेही वाचा...एवढा पोलीस बंदोबस्त, अतिरेकी शिरले की काय? फडणवीसांच्या दौऱ्यावर शेट्टींचा टोला

दीपक ठोंगरे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार नारायण कुचे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोरीला हाताशी खोटे गुन्हे दाखल केले. पदाचा गैरवापर करीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या भीतीनं मला तडीपार केल्याचा गंभीर आरोप दीपक डोंगरे यांने केला आहे. एवढंच नाही तर आमदार कुचे यांनी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याला आमदार कुचे हेच सर्वस्वी जबाबदार राहतील, असं दीपक डोंगरे यांने म्हटलं आहे.

मला पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल आणि दूध का दूध पानी का पानी होईल, असंही डोंगरे यानं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

विविध गुन्ह्यातील आरोपी असलेल्या दीपक डोंगरे याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जालना पोलिसांकडून दीपक डोंगरे यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून आरोपी दीपक डोंगरे याला 2 वर्षे तडीपार अर्थात जालना जिल्ह्याच्या हद्दपार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 27, 2020, 8:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या