विनापरवानगी बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, भाजप आमदाराला अटक

विनापरवानगी बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, भाजप आमदाराला अटक

भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा विनापरवाना बसविण्यात आला.

  • Share this:

जालना, 13 सप्टेंबर: जालना जिल्ह्यातील अंबड येथील पाचोड चौकात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर भल्या पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास एका आयशर वाहनातून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून बसवण्यात आला.शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही.

भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा विनापरवाना बसविण्यात आला. दरम्यान, रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर आमदार नारायण कुचे यांच्यासह 41 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांशी शाब्दिक चकमक..

यावेळी पोलीस आणि आमदार व समर्थकात शाब्दिक चकमक देखील झाली. अंबड शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काही तरुणांनी अंबडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला असून लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथं गेलो होतो, त्यात गैर काय पोलिसांनी मला का अटक केली. हे मला माहित नसल्याचे आमदार नारायण कुचे यांनी सांगितले आहे.

या आमदाराचा राजीनामा घेण्यासाठी चक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभा सदस्याचा राजीनामा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी औरंगाबादला पोहोचले. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे चक्क चक्क मोटारसायकलवर आल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्षांकडे सुपर्द केला. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा हातोहात मंजुरही केला.

दरम्यान, भास्कर जाधव आज 2 वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: भास्कर जाधव यांना शिवबंधन बांधणार आहेत. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

चक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष...

झाले असे की, कुंभेफळ जवळील रेल्वे क्रॉसिंगवर फाटक पडल्याने उशीर होत होता. भास्कर जाधव वाट पाहत असल्याने हरिभाऊ बागडे यांनी पायी चालत जाऊन रेल्वे रुळ ओलांडले. एका मोटारसायकलस्वाराला त्यांनी हात दिला. चक्क हरिभाऊ मोटारसायकलवर बसून कुंभेफळला पोहोचले आणि तिथे त्यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा स्विकारला. भास्कर जाधव यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब विशेष विमानाने औरंगाबादला आले होते. आता ते परत त्याच विमानाने मुंबईला निघाले आहे.

इथं बोलू नका...जे काय बोलायचं ते मुंबईला!

इथं बोलू नका...जे काय बोलायचं ते मुंबईमध्ये बोलू, असे मिलिंद नार्वेकर यांनी मीडियाला सांगितले. माझा पुढचा राजकीय प्रवास आता उद्धव ठाकरे हेच ठरवतील, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी केली खास विमान व्यवस्था...

भास्कर जाधव आपला राजीनामा सचिवांकडे देऊन तो विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फॅक्सने पाठवून त्यांची स्वाक्षरी घेता आली असती. परंतु यात खूप वेळ जाईल, म्हणून स्वत: उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी खास विमानाची व्यवस्ठा केल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस लेकीसोबत पोहोचले गिरगाव चौपाटीवर VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2019 11:20 AM IST

ताज्या बातम्या