बीडमध्ये भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीची निर्घृण हत्या, डोक्यात घातला दगड

नामदेव शिनगारे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला आहे. धारुर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर नामदेव शिनगारे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 09:07 PM IST

बीडमध्ये भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीची निर्घृण हत्या, डोक्यात घातला दगड

बीड, 12 ऑगस्ट-  किल्ले धारुर येथील भाजपच्या माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव शिनगारे यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. नामदेव शिनगारे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला आहे. धारुर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर नामदेव शिनगारे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनास्थळी पोलीस पोहोचले आहे. जुन्या आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नामदेव शिनगारे यांच्यासोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाला आहे.  गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

धारूर येथील माजी नगराध्यक्ष पती नामदेव शिनगारे हे धारूर नगर परिषदेचे कर्मचारी होते. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका ऑईल मिलशेजारी असलेल्या एका सोयाबीनच्या शेतात त्यांचा डोक्यात दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. या वेळी त्यांची अर्धा किलोमिटर अंतरावर दुचाकी आढळून आली. मृतदेह असलेल्या ठिकाणी दोन मोठे दगड आढळून आले. दोन्ही दगड रक्ताने माखलेले आहेत. एक चश्मा, एक मोबाईल आढळून आला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

'तो' पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...