मी असेपर्यंत गायी खुशाल कापा.. रावसाहेब दानवेंकडून गोहत्या बंदी कायद्याची 'कत्तल'

मी असेपर्यंत गायी खुशाल कापा.. रावसाहेब दानवेंकडून गोहत्या बंदी कायद्याची 'कत्तल'

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई,23 ऑक्टोबर: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. 'मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, तुम्हाला कोणी मनाई करणार नाही', असे वक्तव्य करून रावसाहेब दानवेंकडून गोहत्या बंदी कायद्याची जाहीर 'कत्तल' करण्यात आल्याची खोचक टीकाही आता होताना दिसत आहे. रावसाहेबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वक्तव्यामुळे रावसाहेबांवर टीकेची झोड उठली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदार संघातून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत. आपल्या मुलाच्या प्रचारासाठी गेल्या 19 ऑक्टोबरला रावसाहेबांनी कठोरा बाजार येथे मुस्लिम समुदायातील नागरिकांची सभा बोलावली होती. या सभेला संबोधित करताना रावसाहेबांनी 'मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, तुम्हाला कोणी मनाई करणार नाही', असे वक्तव्य करून नरेंद्र मोदी सरकारच्या गोहत्या बंदी कायद्याची जाहीर कत्तल केली. रावसाहेबांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदुत्त्ववाद्यांमध्ये संताप व्यत्त केला जात आहे. यानंतर रावसाहेबांवर टीकेची झोड उठली आहे.

दोन नंबरच्या धंद्याबाबतही कबुली..

केंद्रात भाजपचे सपकार आल्यानंतर देशात भ्रष्टाचार कमी झाल्याच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. मात्र, भोकरदन तालुक्यात दोन नंबरचे धंदे अर्थात अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे कठोरा बाजार येथील सभेत रावसाहेब दानवे यांनी कबुली दिली आहे.

रावसाहेबांनी केला हा खुलासा...

सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सायंकाळी एक प्रसिद्ध पत्रक काढून या संदर्भात खुलासा केला आहे. कठोरा बाजार येथील सभेत आपण असे बोललोच नाही, असा दावा रावसाहेबांनी केला आहे. या व्हिडिओत छेडछाड केल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

VIDEO: EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 01:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading