मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पंकजा मुंडेंनी मैदान सोडलं, बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या रणनीतीने राष्ट्रवादीने मारली बाजी

पंकजा मुंडेंनी मैदान सोडलं, बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या रणनीतीने राष्ट्रवादीने मारली बाजी

शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर आज होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी वरचढ होणार, हे निश्चित झालं आहे.

शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर आज होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी वरचढ होणार, हे निश्चित झालं आहे.

शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर आज होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी वरचढ होणार, हे निश्चित झालं आहे.

सुरेश जाधव, बीड, 4 जानेवारी : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या बीड जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आधीच स्पष्ट झाला आहे. कारण पंकजा मुंडे यांनी मैदान सोडलं आहे. 'लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे. बाकी निकाल स्पष्टच आहेत,' असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे संख्याबळ राष्ट्रवादीच्या बाजूने झुकल्याचं स्पष्ट आहे.

'बीड जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यातील आघाडीचा परिणाम दिसत आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे. बाकी निकाल स्पष्टच आहे,' असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर आज होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी वरचढ होणार, हे निश्चित झालं आहे.

शिवसेनेला खुली ऑफर, मंत्र्याने राजीनामा देताच भाजप खासदाराने केलं खळबळनक वक्तव्य

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून 13 जानेवारीला निकाल लागणार आहे. मात्र निवडणुकीआधीच पंकजा मुंडे यांनी तलवार म्यान केली आहे. मुंडे बहीण-भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे शनिवारी पहिल्यांदा बीडमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यात महत्त्वाची निवडणूक असूनही पंकजा मुंडे मात्र परदेश दौऱ्यावर आहेत.

भाजपाच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे देखील बीडमध्ये तळ ठोकून होत्या. जिल्हा परिषदेचा गड राखण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न केले. तर बहुमताचा आकडा जुळवाजुळव करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्का देण्याची तयारी केली. 60 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत 5 अपात्र सदस्य, दोन आमदार सदस्यानी राजीनामा दिल्यामुळे 53 हा आकडा आहे. बीड जिल्हा परिषदेत बहुमत मिळवण्यासाठी 27 हा जादुई आकडा आहे.

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, उद्धव ठाकरे सरकारला पहिला धक्का

धनंजय मुंडे गटाकडे दोन दिवसापूर्वी केवळ 23 सदस्यांचे संख्याबळ होत आहे. तर भाजपकडे 26 सदस्य असल्याचा दावा केला जात होता. भाजपमधील चार सदस्य आणि शिवसेना 4 असा 31 चा आकडा राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

पंकजा मुंडेंनी दिला होता धक्का

बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक जि.प सदस्य निवडून येऊन देखील पंकजा मुंडेनी राजकीय खेळी करत अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवत बाजी मारली होती. यात भाजपा, शिवसेना, शिवसंग्राम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच बंडखोर अशी राजकीय खिचडी करत सत्ता समीकरण जुळवले होते. पण विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेच्या पराभवानंतर आता राष्ट्रवादी वरचढ झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन करताच धनंजय मुंडेदेखील जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.

First published:
top videos

    Tags: Dhananjay munde, Pankaja munde