वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं, पंकजा मुंडे यांनी शेअर केली Facebook पोस्ट

वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं, पंकजा मुंडे यांनी शेअर केली Facebook पोस्ट

विजय हमारी हमारे ललाट पर लिखी है । स्वयं जलकर हमनें औरोंके घर किये उजारे है।

  • Share this:

परळी 21 ऑक्टोंबर : भाजपच्या नेत्या आणि परळीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी हिंदींची एक कविता शेअर करत आपल्या विरोधकांवर निशाना साधलाय. आमचा विजय हा निश्चित आहे. जे मनानेच हरले आहेत ते काय आमच्याशी युद्ध लढणार असा टोलाही त्यांनी त्यांचे विरोधक धनंजय मुंडे यांना लगावलाय. परळीत मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर त्यांनी आपल्या Facebook वर पोस्ट करत एक हिंदी कविता शेअर केली. त्या कवितेतून त्यांनी  आपल्या भावना तर व्यक्त केल्याच पण त्याच बरोबर विरोधकांना टोलाही लगावला. त्यांनी पोस्ट केलेली ही कविता अशी आहे.

घने अंधकार को चीरते आसमान के तारे हैं।

स्वयं जलकर हमनें औरोंके घर किये उजारे है।

विजय हमारी हमारे ललाट पर लिखी है ।

वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं ।

मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर, म्हणाले...

20 तासानंतर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. आता त्या वादावर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलंय. मतदानाच्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जे वक्तव्य करण्यात आलं ते महिलांचा अवमान करणारं आणि सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासणार आहे. खोटेपणा आणि दाभिकपणाचा मला राग आलाय. राजकारणाची ही जी पातळी खालावली ती चीड आणणारी आहे. लोकांना खरे अश्रू आणि खोटे अश्रू कळतात. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यावरही मला ते अश्रू आढळले नाही असा टोलाही त्यांनी धनंजय मुंडे यांना

लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 11:08 AM IST

ताज्या बातम्या