Home /News /maharashtra /

पाण्यासाठीच्या आंदोलनात पंकजा मुंडेंनी केलं मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक

पाण्यासाठीच्या आंदोलनात पंकजा मुंडेंनी केलं मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक

'सरकार येऊन शंभर दिवस झाले नाही तोच उपोषण केलं त्यामुळं काहीजण पोटशूळ आला असं म्हणतील, मात्र सरकारनं स्वप्न पूर्ण करावं, शेतात पाणी आल्यावर तो आत्महत्या करणार नाही.'

औरंगाबद 27 जानेवारी : मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज औरंगाबदमध्ये उपोषण केलं. या उपोषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे पाटीलही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी हे सरकार विरोधातलं उपोषण नाही तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आहे असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात येण्यापूर्वी पाण्यावर काम करत आहेत, मी भाजपची कार्यकर्ता आहे पण समाजसेविका म्हणून काम करणार, मला कोणती लालसा नाही, तुमच्या मनात माझं स्थान आहे ते सर्वोच्च आहे, मला अमेरिका राष्ट्राध्यक्ष दिलं तरी मला ते नको. सरकार येऊन शंभर दिवस झाले नाही तोच उपोषण केलं त्यामुळं काहीजण पोटशूळ आला असं म्हणतील, मात्र सरकारनं स्वप्न पूर्ण करावं, शेतात पाणी आल्यावर तो आत्महत्या करणार नाही, त्याला कर्जमाफीची गरज नाही. माझा कारखाना असून खूप अडचणी आहे, कसा लोकांना रोजगार मिळेल, पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस पाहून डोळे दिपतात मात्र आमच्याकडे पाणी दिसत नाही, इथले लोक रोजगार साठी स्थलांतर करत आहेत, काही म्हणतात तुम्ही काय केलं, मला कोणाचा राग नाही लोभ नाही, मी समाजसेविका आहे, सरकार विरोधी उपोषण नाही तर लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण आहे. उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, चव्हाणांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत ठिणगी माझा कारखाना असून खूप अडचणी आहेत. कसा लोकांना रोजगार मिळेल, पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस पाहून डोळे दिपतात मात्र आमच्याकडे पाणी दिसत नाही, इथले लोक रोजगार साठी स्थलांतर करत आहेत, काही म्हणतात तुम्ही काय केलं, मला कोणाचा राग नाही लोभ नाही.

मुख्यमंत्र्यांचा रिमोट कोण चालवतं यापेक्षा विकास महत्त्वाचा, विखे पाटलांचा टोला

तीन पक्ष जे एकत्र बसत नव्हते त्यांचं सरकार आहे, मुख्यमंत्रीं आणि माझे संबंध चांगले, ते संवेदनशील मुख्यमंत्री ते आमच्या मागण्या अमान्य करु शकत नाही. मराठवाड्यात एक कॅबिनेट घेतली तर मराठवाड्याला न्याय मिळेल, आम्ही कॅबिनेट घेऊन कामं केले आहे, मराठवाड्याला न्याय द्या यांनी सेनेला भरपूर दिलं त्यांनी बाळासाहेबांवर प्रेम केलंय.

महाआघाडीत जुंपली, शिवसेनेच्या मंत्र्याने अशोक चव्हाणांना फटकारले

उपोषण ही सुरुवात आहे, काहीना वाटले ताई नाराज आहे मात्र मी कुठं पांघरूण घेऊन झोपले नवते, मुंडे साहेब वारले या पेक्षा जास्त झालं काय, माझी संपत्ती सरकारशी दालनं आणि तिथली पाटी नाही तर माझी संपत्ती तुम्ही आहात.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या