बीड जिल्ह्यात भाजपचा हा उमेदवार अडचणीत, केले धक्कादायक वक्तव्य

बीड जिल्ह्यात भाजपचा हा उमेदवार अडचणीत, केले धक्कादायक वक्तव्य

गावागावात धनंजय मुंडे यांचे पुतळे जाळून निषेध करा...

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,20 ऑक्टोबर: आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भीमराव धोंडे यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. राष्ट्रवादीने भीमराव धोंडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या 'त्या' कथित वक्तव्याच्या निषेधार्थ आष्टीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर भीमराव धोंडे यांनी लोकांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केलेले पंकजा मुंडे संदर्भात विधान लक्षात ठेऊन गावागावातून मतदानातून निषेध करा. तसेच गावागावात त्यांचे पुतळे जाळून निषेध करा, निषेध व्यक्त करताना कमळाचे चिन्हा समोरील बटन दाबून राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करा,असे वक्तव्य केले होते. यामुळे आदर्श आचारसंहिता सुरू असताना व प्रचाराची मर्यादा संपलेली असताना भीमराव धोंडे यांनी जाहीर भाषणामध्ये केलेले वक्तव्य हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून या बाबत विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे हे यासंदर्भात तक्रार देणार असल्याचे समजते. भीमराव धोंडे अडचणीत सापडले आहेत.

आष्टी मतदार संघात रविवारी पंकजा मुंडेंसंदर्भात धनंजय मुंडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी थेट आष्टी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चा संपल्यानंतर भीमराव धोंडे व सुरेश धस यांनी त्यंच्या निवासस्थानी आल्यानंतर उपस्थिती लोकांना मार्गदर्शक केले. यावेळी भीमराव धोंडे व सुरेश धस यांनी निषेध व्यक्त करताना राष्ट्रवादी पक्षावर टीका केली. तसेच भीमराव धोंडे म्हणाले की, गावागावातून मतदानातून निषेध व्यक्त करा. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार करा, असेही वक्तव्य केले. यामुळे एकूणच या घडलेल्या प्रसंगामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही मत आष्टी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी नम्रता चाटे यांनी सांगितले. यामुळे भीमराव धोंडे पुन्हा एकदा चर्चमध्ये आलेले आहेत तर त्यांच्या अडचणीत वाढ झालेले आहे.

विशेष म्हणजे भीमराव धोंडे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगत असताना आमदार सुरेश धस आणि मी स्वतः फोन केल्यामुळे तुम्ही सर्वजण आलात आणि निषेध व्यक्त केला, असा उल्लेख केला यामुळे हे बेकायदेशीर रित्या जमवलेला जमाव ही भीमराव धोंडे यांच्या सांगण्यावरून आला होता की काय? असाही प्रश्न निर्माण केला जातोय. प्रचाराची अंतिम मुदत संपल्यानंतर अशा पद्धतीने जाहीर भाषणांमध्ये वक्तव्य करणं हे आचारसंहितेचा भंग समजल्या जात.तसेच कलम 144 मधे परवानगी नसताना मोर्चा काढणे, हा देखील कायद्याचा भंग आहे. यामुळे भीमराव धोंडेवर कारवाई होऊ शकते, असे बोलले जात आहे.

'बहीण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न', धनंजय मुंडे झाले भावुक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 06:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading