श्राद्धासाठी मद्य घ्यायला आलेल्या तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

श्राद्धासाठी मद्य घ्यायला आलेल्या तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

सध्या पितृपक्ष सुरू आहे. वाईन शॉपीवर श्राद्धासाठी मद्य घ्यायला आलेल्या एका तरुणाच्या डोक्यात चक्क बिअरची भरलेली बाटली फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

विजय कमळे पाटील,(प्रतिनिधी)

जालना, 26 सप्टेंबर: सध्या पितृपक्ष सुरू आहे. वाईन शॉपीवर श्राद्धासाठी मद्य घ्यायला आलेल्या एका तरुणाच्या डोक्यात चक्क बिअरची भरलेली बाटली फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. ही घटना जालना शहरात घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जालना शहरातील भारतमाता मंदिर परिसरात राहणारा नितीन गुमरे हा पितृपक्षाच्या पूजेसाठी मद्य आणण्यासाठी दीपक वाईन शॉपीवर गेला होता. दुकानाची पायरी चढताना नितीनचा एका व्यक्तीला धक्का लागला. नितीन याने सॉरी म्हटल्यावर देखील समोरीस व्यक्तीने त्याच्याशी वाद घातला. त्याने नितीनला अरेरावी केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पाहता पाहता या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. दुकानाबाहेर असलेल्या 2 अनोळखी व्यक्तीने नितीनला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, याचवेळी एकाने रागाच्या भरात आपल्या साथीदाराच्या हातातील भरलेली बिअरची बाटली हिसकावून थेट नितीनच्या डोक्यात फोडली. रक्तबंबाळ झालेल्या नितीनला पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर जालना शहरातील भारतमाता मंदिर परिसरात तणाव पसरला होता. गंभीर जखमी झालेल्या नितीनवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दारूच्या दुकानात राडा, भरलेली बिअरची बाटली डोक्यात फोडली LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 05:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading