बीडमध्ये शिक्षकच झाला नराधम, शाळेतील मुलींवर केले लैंगिक अत्याचार

बीडमध्ये शिक्षकच झाला नराधम, शाळेतील मुलींवर केले लैंगिक अत्याचार

शिक्षकाकडूनच मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

  • Share this:

बीड, 18 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये लैंगिक छळाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकाकडूनच मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

गेवराई शहराजवळ एका जिल्हा परिषद शाळेमध्ये मुली शाळेत जाण्यास नकार देत असल्याची तक्रार पालकांनी केली होती. यासंदर्भात शिक्षण विभागाने चौकशी समिती गठित केली होती. समितीने विद्यार्थ्यांनींशी चर्चा केली असता त्यांचा लैंगिक छळ होत असल्यामुळे शाळा नको, अशी आपबीती त्यांनी बोलून दाखवली.

समितीने दिलेल्या अहवालानुसार संबंधित दोषी शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. यामुळे मात्र बीड जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

आईला रोज मारहाण करणाऱ्या पित्याला मुलानेच संपवलं, डोक्यात घातली लाकडी फळी

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून शिक्षकांकडूनच विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जीवनाचे धडे देणारे शिक्षकच नराधम होऊ लागल्याने विश्वास तरी कुणावर ठेवायचा, असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

First published: February 18, 2020, 4:56 PM IST

ताज्या बातम्या