रस्त्याची दुर्दशा.. वेदनेने विव्हळणाऱ्या आईला चिखलातून वाट काढत नेले स्ट्रेचरवर

चक्क 60 वर्षांच्या वृद्ध महिला रुग्णाला रुग्णवाहिकेविना वैद्यकिय तपासणीसाठी चिखलातून वाट काढत स्ट्रेचरवर ओढत नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 02:59 PM IST

रस्त्याची दुर्दशा.. वेदनेने विव्हळणाऱ्या आईला चिखलातून वाट काढत नेले स्ट्रेचरवर

बीड, 6 सप्टेंबर: शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि चिखलामुळे अपघात होणे आता नित्याचे झाले आहे. त्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर खड्डे एवढे आहेत की, चक्क 60 वर्षांच्या वृद्ध महिला रुग्णाला रुग्णवाहिकेविना वैद्यकिय तपासणीसाठी चिखलातून वाट काढत स्ट्रेचरवर ओढत नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.

चिखलामय रस्त्याने स्ट्रेचर ओढताना नातेवाईकांची चांगलीच दमछाक झाली. वेदनेने विव्हळणाऱ्या आईला घेऊन मुलगा आणि नातू दोघेच ओढत होते. खराब रस्त्यातून स्ट्रेचर ओढणाऱ्या नातेवाईकाचा संताप अनावर झाला.यामुळे नगरपालिकेच्या कारभाराचा खरा चेहरा चव्हाट्यावर आला आहे.

ग्रामीण भागातील सीताबाई मुरकुटे या पायच्या आजारामुळे त्रस्त आहेत. पायाने चालता येत नाही. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. डिजिटल एक्स-रे काढण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर नेताना चक्क 60 वर्षांच्या आजीला स्ट्रेचरवर ओढत न्यावे लागले. हॉस्पिटलपासून एक्स-रे लॅब अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. या दरम्यानचा रस्ता अतिशय खराब आहे. स्ट्रेचर ओढत नेऊन आजीचा डिजिटल एक्स-रे काढला, मात्र त्यासाठी मुलगा आणि नातवाला मोठी कसरत करावी लागली. यावेळी नातेवाईकांनी डॉक्टरावर चांगलाच राग काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे बीड नगरपालिकेच्या विकासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तसेच शहरातील रस्ते भुयारी गटारी योजनेचे कारण पुढे करत मुख्य रस्ते खोदून टाकल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या बाबत नगरअध्यक्षांनी सांगितले की, रस्त्यासाठी विकास निधी आला आहे. मात्र, सध्या पावसाळा असल्यामुळे अडचणी येत आहेत. मात्र लवकरच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.

VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2019 02:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...