अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून बीडमध्ये राजकारण तापले.. संभाजी ब्रिगेड आक्रमक

अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून बीडमध्ये राजकारण तापले.. संभाजी ब्रिगेड आक्रमक

विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू होण्याआधीच बीडचे निवासी उपजिल्हाअधिकारी (RDC) महेंद्रकुमार कांबळे यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

  • Share this:

बीड, 26 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू होण्याआधीच बीडचे निवासी उपजिल्हाअधिकारी (RDC) महेंद्रकुमार कांबळे यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आठ वर्षे एका जिल्ह्यात सेवा केल्यानंतर पुन्हा सहा महिन्यांत निवडणूक आदर्श आचारसंहिता लागण्याच्या काही तास आगोदर पुन्हा बीडमध्ये बदली करुन घेण्यामध्ये स्वार्थ काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यावरून बीडमध्ये राजकारण तापले आहे. उपजिल्हाअधिकाऱ्यांच्या बदलीच आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होवू शकतो, यामुळे त्यांची बदली तत्काळ रद्द करा, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात बीड जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हर यांनी तक्रार दिली.

..तर लोकशाही मार्गाने आंदोलन..

बीडचे निवासी उपजिल्हाअधिकारी (RDC)महेंद्रकुमार कांबळे यांची नियुक्ती रद्द केली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. या बदली संदर्भात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्या बरोबरच बीडमधील अनेक पक्षांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरला आहे. यामुळे या अधिकाऱ्यांची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

महेंद्रकुमार कांबळे हे यापूर्वी जिल्ह्यात सुमारे आठ वर्षे कार्यरत होते. त्यांची नियमानुसार फेब्रुवरी 2019 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात बदली करुन घेतली. पण लगेचच सहा महिन्यांच्या आत त्यांची पुन्हा बीडला निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यांचा मागचा कार्यकाळ पाहता अनेक घोटाळे व वादग्रस्त कारकिर्द राहिलेली आहे. जसे की, परळी गेस्ट हाऊस भूसंपादन प्रकरणी 10 कोटीचा बोगस अवॉर्ड केलेचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील रोहयोच्या अनेक कामांत सुनावणी करताच बेकायदेशीररित्या मंजुरी दिल्याचे उघड झालेले आहे. यामुळे त्यांची तत्काळ नियुक्ती रद्द करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राहुल वाईकर यांनी केली.

बीडमधील अनेक प्रकरणात त्यांचा संबंध असू शकतो. त्यामुळे असा वादग्रस्त अधिकारी निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागण्याच्या काही तासापूर्वी त्यांची नियुक्ती ऑर्डर निघते कशी व पुन्हा बीडला बदली करुन घेण्यात संबंधीत अधिकाऱ्याचा स्वार्थ तर दडलेला नाही ना? यामुळे या वादग्रस्त अधिकाऱ्याची निवडणुकीच्या तोंडावर बीड येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून झालेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी अॅड. नारायण शिरसाट यांनी केली.

आचारसंहितेच्या काही तास आगोदर बदली होते कशी, त्यामुळे ही तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच या नियुक्ती मध्ये विधान सभा निवडणुक आदर्श आचार संहितेच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी केली. निवडणुकीच्या तोंडावर असे हेतुपुरस्कर बदली करुन घेणे हा निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचा भंगच आहे. यामुळे या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती रद्द करा, अन्यथा छोट्या पक्षांवर अन्याय होईल, अशी शक्यता किशोर गिराम यांनी सांगितले आहे. बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे आणि संबंधी निवासी उपजिल्हाअधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बोलण्यास नकार दिला.

महेंद्रकुमार कांबळे यांचा कार्यकाळ...

1) उपजिल्हाधिकारी (का) , बीड दि. 08-03-2011 ते दि. 02-10-2011

2) उपजिल्हाधिकारी (रोहयो), बीड दि . 03-10-2011 ते दि.30-04-2012

3) विशेष भूसंपादन अधिकारी (लपा), बीड दि. 01-05-2013 ते दि. 02-03-2014

4) उपविभागीय अधिकारी, माजलगाव दि. 03-03-2014 ते दि. 30-11-2017

5) उपजिल्हाधिकारी (रोहयो), बीड दि. 01-12-2017 ते दि. 01-02-2010

6) फेब्रुवारीमध्ये बदली होऊन उस्मानाबाद येथे नियुक्ती

7) निवासी उपजिल्हाधिकारी, बीड दि.20-09-2019 रुजू..

VIDEO:पुण्याच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading