आरोप करणारे स्वत:चेच कपडे फाडून घेतील; पुन्हा पेटला काका पुतण्याचा वाद

आरोप करणारे स्वत:चेच कपडे फाडून घेतील; पुन्हा पेटला काका पुतण्याचा वाद

'मी चारित्र्य जपणारा माणूस आहे. कुणावरही उगाच आरोप प्रत्यारोप करणं आवडत नाही. मात्र जे कुणी आरोप करताहेत त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.'

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 26 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचे वाद काही कमी नाहीत. बीड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असणाऱ्या क्षीरसागर घराण्यातल्या काका पुतण्याचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा बीड मध्ये आल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांनी आपले काका आणि राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली होती. पुतण्याच्या या आरोपांना जयदत्त क्षीरसागर यांनी जोरदार उत्तर दिलंय. ज्यांनी आरोप केले त्यांनाच स्वत:चेच कपडे फाडून घेण्याची वेळ येईल असा पलटवार त्यांनी केलाय. या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच तापलंय.

जयदत्त क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचं वर्चस्व वाढत असल्याने ते नाराज होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना मंत्रिपदही दिलं. त्यामुळे बीडच्या राजकारणात मोठे बदल घडून आलेत. या पक्षांतरानंतर राष्ट्रवादीने संदीप क्षीरसागर यांच्या पारड्यात वजन टाकत नवं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केलाय.

काँग्रेस काय करणार 'महापर्दाफाश'? जनतेनेच पोल खोलली; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

जयदत्त क्षीसागर म्हणाले,  मी चारित्र्य जपणारा माणूस आहे. कुणावरही उगाच आरोप प्रत्यारोप करणं आवडत नाही. राजकारणात काही मुल्य असावीत या मताचा मी आहे. मात्र जे कुणी आरोप करताहेत त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. जे कपडे फाडायची भाषा करतात त्यांनी स्वत:चे कपडे फाडायची वेळ येईल असंही ते म्हणाले.

'मराठवाडा दुष्काळमुक्त करू'

पुढील पाच वर्षांत बीड जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळमुक्त करू, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री सोमवारी बोलत होते. राज्याच्या ग्रामविकास मंत्री व बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी मराठवाडात दाखल झालेल्या महाजनादेश यात्राचे आष्टी तालुक्यांतील धामणगाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' शब्द

कडा येथे आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'या पाच वर्षांत आम्ही रस्ते, ग्रामीण पायभूत सुविधा दिल्या. पुढील पाच वर्षांत कायम स्वरूपीचा दुष्काळ नाहीसा करू. यासाठी कोकणातून समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वॉटर ग्रिडच्या माध्यमातून वळवू. यासाठी पुन्हा एकदा आशीर्वाद द्या.' या सभेचे नियोजन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले होते.

Mission Paani : सावध व्हा, पुढच्या 30 वर्षात संपणार या राज्यांमधलं पाणी?

मराठवाड्यात महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्यासोबत पंकजा मुंडे, मंत्री राम शिंदे व जिल्हातील सर्व भाजप आमदार पुढील दोन दिवस सोबत असणार आहे. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ मुक्तीची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 06:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading