'प्रोजेक्ट कवच'...आता बीड पोलिसच महिलांना सुरक्षित घरी पोहोचविणार

'प्रोजेक्ट कवच'...आता बीड पोलिसच महिलांना सुरक्षित घरी पोहोचविणार

'रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुठेही असुरक्षित वाटत असल्यास पोलीस कंट्रोल रूम किंवा 1091 क्रमांकवर फोन करा पोलीस घटनास्थळी पोचून सुरक्षितपणे घरी पोचवतील.'

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 03 डिसेंबर : महिलांवरील आत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता आपल्या जिल्ह्यातील कोणावरही अशी वेळ येऊ नये म्हणून बीड पोलीसांच्या वतीने "प्रोजेक्ट कवच" ही मोहिम सुरू केली असून विषेश करून ही मोहिम कामानिमित्त घराबाहेर असणार्‍या अधिकारी ते मजूर महिलांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 वाजे पर्यंत कुठेही असुरक्षित वाटत असल्यास पोलीस कंट्रोल रूम किंवा 1091 क्रमांकवर फोन करा पोलीस घटनास्थळी पोचून सुरक्षितपणे  घरी पोचवतील अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांनी जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला कवच नावाचं मोबाईल ॲप कार्यान्वित केलं आहे. सदर मोहिमेच्या माध्यमातून रात्रीच्यावेळी अडचणीत सापडलेल्या महिलांना पोलीस यंत्रणा घरपोहोच सुरक्षित सोडण्यासाठी तत्पर असणार आहे.

पुण्यात TCSच्या कर्मचाऱ्याची ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

हैदराबाद नजीक तेलंगणात पशुवैद्यकीय महिला अधिकारी डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्या निर्घुण हत्येनंतर संपूर्ण भारत देश हादरला आहे. देशभरातून महिला व पालक वर्गात याबाबत तीव्र संताप व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पशुसंवर्धन विभाग बीड मधील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे याबाबत निवेदन सादर केलं.

'हिंदू संतांची मदत केली नसल्यानेच फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद गेले'

या अमानुष घटनेचा पशुसंवर्धन विभाग बीड यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करावी अमानुष अत्याचाराचा या प्रकरणात सहभागी दोषींना मरेपर्यंत फाशी पेक्षा जबर म्हणजेच पीडिता प्रमाणे असह्य यातना व वेदना याद्वारे मृत्यूची शिक्षा देण्यात यावी. याप्रसंगी पशुसंवर्धन विभागातील महिला अधिकारी सर्व डॉक्टर श्रीमती सारिका जावळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सूरेवाड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर पालवे संतोष आदी उपस्थित होते.

First Published: Dec 3, 2019 09:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading