'सचिन तेंडुलकरांनी दिलेल्या खासदार फंडाच्या निधीचा बीड पालिकेकडून गैरवापर'

'सचिन तेंडुलकरांनी दिलेल्या खासदार फंडाच्या निधीचा बीड पालिकेकडून गैरवापर'

'औरंगाबाद हायकोर्टाने निकाल देत तीन आठवड्यात विशेष लेखा परीक्षण करावे असा आदेश दिला आहे.'

  • Share this:

सुरेश जाधव बीड, 10 सप्टेंबर : सचिन तेंडुलकर यांनी दिलेल्या खासदार फंडाच्या एक कोटी निधीत बीड नगर पालिकेने अपहार केल्याचा गंभीर आरोप MIMचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी केलाय.  जळगाव मधील घरकुल घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा बीड नगरपालिकेत असल्याचंही ते म्हणाले. सचिन तेंडुलकर यांनी दिलेल्या एक कोटीच्या खासदार फंडाचे काम न करताच पैसे उचलल्याचं निजाम यांनी म्हटलं आहे. लवकरच जळगाव मधील घरकुल घोटाळ्याप्रमाणे बीड मध्ये देखील कोट्यवधीचा घोटाळा पुढे येईल. या बाबतीत औरंगाबाद हायकोर्टाने विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं.  यामुळे गेल्या चाळीस वर्षा पासून नगर परिषदेवर एक मुखी सत्ता हाकणाऱ्या क्षिरसागर बंधूना मोठा धक्का असेल असंही शेख निजाम म्हणाले. जयदत्त क्षिरसागर आणि भारत भुषण क्षिरसागर यांच्याकडेच गेली 4 दशकं पालिकेची सत्ता आहे.

'भाजपमध्ये जाणारी 'मुलं' वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात'

बीड नगर परिषदेने विकास कामत घोटाळा केल्याचा आरोप करत आज एम.आय.एमने आज पत्रकार परिषद घेवून पोल खोल करण्याचा दावा केला. तसच जनहीत याचिकेवर औरंगाबाद हायकोर्टाने निकाल देत तीन आठवड्यात विशेष लेखा परीक्षण करावे असा आदेश दिला आहे यामुळे क्षिरसागर बंधू अडचणीत येतील असं बोलल जातंय. हाय कोर्टात दाखल केलेल्या जनहीत याचिकेत 2010-11 ते 2014-15 या कालवधीत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनां राबवताना बांधकाम विभागाच्या निविदा शासन नियम प्रमाणे नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'ला आदित्य ठाकरेंचा विरोध

ई-निविदा केल्या नाहीत असा ठपका ठेवण्यात आलेला आहे. तसेच वारंवार मागणी करुन देखील लेखा परीक्षणसाठी कागदपत्रे उपलब्ध करुन दिली नाहीत, लेखा अधिकारी अनेकदा आले पण न.प ने सहकार्य केले नाही. असे गंभीर ताशेरे लेखा परीक्षणात असल्याचाही दावा करण्यात येतोय. जनहीत याचिकेवर सुनावणी करताना तीन आठवड्यात विशेष लेखा परीक्षण करुन अहवाल न्यायालयात सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 05:46 PM IST

ताज्या बातम्या