विवेक रहाडे आत्महत्या प्रकरण : UP पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र पोलीसही दडपशाही करत आहेत, गंभीर आरोप

विवेक रहाडे आत्महत्या प्रकरण : UP पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र पोलीसही दडपशाही करत आहेत, गंभीर आरोप

'राज्य सरकार विषयाला वेगळ्या दिशने नेण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारला मराठा समाजाच्या तीव्र रोषाला समोर जावं लागेल.'

  • Share this:

बीड, 4 ऑक्टोबर : 'विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येला सरकार वेगळं वळण देत आहे. उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार पीडित कुटुंबावर दडपशाही करत असेल तर कदापिही मराठा समाज सहन करणार नाही. राज्य सरकार विषयाला वेगळ्या दिशने नेण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारला मराठा समाजाच्या तीव्र रोषाला समोर जावं लागेल,' असा धमकीवजा इशारा असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक-महेश डोंगरे यांनी दिला आहे. ते परळीत बोलत होते.

मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न असताना पोलीस भरती, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू असताना सरकार दबाव टाकून विषय भरकटवत आहे. येणार्‍या काळात सरकारला हे महागात पडेल. आधीच आमचे 42 बांधवाचे बलिदान गेले आहे. सरकारने त्यांच्या कुटुंबाला दिलेला नोकरी आणि मदतीचा शब्द पूर्ण केला नाही. आज आमच्या युवकांनी बलिदान दिले. त्या बलिदाच्या विषयाला डायव्हर्ट करत असाल तर कदापिही मराठा समाज खपवून घेणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांकडून घेण्यात आली आहे.

'9 तारखेला तुळजापूरला जागर मोर्चा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल. अजून तुम्हाला चार-पाच दिवस आहेत. तुम्ही तात्काळ पोलीस भरतीला स्थगिती द्या. सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर मराठा समाज तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही,' अशी टीका यावेळी सरकारवर करण्यात आली.

बीडमधील तरुणाच्या मृत्यूनंतर समोर आली धक्कादायक माहिती

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नीट परीक्षेत माझा नंबर लागत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून बीड तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र या कथित सुसाईड नोटमधील अक्षर विवेकचे नसल्याचा अहवाल औरंगाबाद येथील हस्ताक्षर तज्ञांनी दिल्याने त्या चिठ्ठीचा बनावटपणा उघड झाला आहे. याप्रकरणी सामाजिक शांतता भंग करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विवेक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 4, 2020, 5:33 PM IST

ताज्या बातम्या